आम्हाला न्याय मिळाला नाही तर रक्तपात होईल – शरद कोळी (ठाकरे गट)
सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही तर रस्त्यावर रक्तपात होईल, असा इशाराच कोळी यांनी दिला आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यातील याच सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू आहे. यादरम्यान, ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी खळबळजनक विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही तर रस्त्यावर रक्तपात होईल, असा सूचक इशाराच त्यांनी दिला आहे. शरद कोळी यांनी केलेल्या विधानावरून राज्यात नवीन वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
आमचा आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. मोदी-शाह, शिंदे-फडणवीस यांनी कायदा विकत घेतला आहे. आमचा विश्वासघात झाला असून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळाले पाहिजे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे. सत्तेवर बसलेली माकडे विकली गेली आहेत. न्याय मिळाला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, रक्तपात झाला तरी चालेल, असा हल्लाबोल करत शरद कोळी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
‘न्याय आमच्याच बाजूने लागेल’, असे म्हणत शरद कोळी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर सडकून टीका केली आहे. चंद्रपूर येथे बोलत असतांना शरद कोळी यांनी केलेले विधान बघता नवा वाद उभा राहील अशी स्थिती आहे. थेट न्यायालयावर शरद कोळी यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे वाद उभा राहू शकतो.