मुंबईत घातपात करण्यासाठी चीन, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्याला इंदूरमध्ये पकडले
राष्ट्रीय तपास यंत्रणानी मुंबई पोलिसांना धोकादायक व्यक्ती देशात आला असल्याची माहिती दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. दरम्यान, एनआयएदिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतलं आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई – चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेली इंदूर येथील सर्फराज मेमन ही संशयास्पद व्यक्ती सध्या मुंबईत पोहोचली असून, तो घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचा संदेश राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (एनआयए) ई-मेलद्वारे पाठविल्याने मुंबई पोलिसांसह अन्य यंत्रणांची झोप उडाली होती. मात्र सरफराज मेमन याच्या मुसक्या आवळण्यात महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला यश आलं आहे. सरफराज याला इंदोरमधून ताब्यात घेण्यात आलं असून, त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा एनआयएकडून मुंबई पोलिसांना एक मेल आला होता. या मेलमध्ये सरफराज मेमन यांच्याबद्दल माहिती देण्यात आली होती. एनआयएकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जो मेल आला आहे, त्या मेलमध्ये सरफराज हा मध्यप्रदेशमधील इंदोरचा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे याबाबत मध्यप्रदेश सरकारला देखील माहिती देण्यात आली होती. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. तसेच त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे लायन्स, परवाना, व्हिसा यासह आधार कार्डची प्रतही मुंबई पोलिसांना मेल करण्यात आली होती.
राष्ट्रीय तपास यंत्रणानी मुंबई पोलिसांना धोकादायक व्यक्ती देशात आला असल्याची माहिती दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. दरम्यान, एनआयएदिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सरफराजला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली असून, त्यांची चौकशी करण्यात येईल. महाराष्ट्र एटीएस संशयित सरफराज मेमनची चौकशी करणार आहे.