“राज्य दोघांच्या भरवश्यावर अन् जनता वाऱ्यावर”; नाथाभाऊंचा हल्लाबोल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

“राज्य दोघांच्या भरवश्यावर अन् जनता वाऱ्यावर”; नाथाभाऊंचा हल्लाबोल

जळगाव (प्रबोधन न्यूज) - एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे सरकार स्थापन होऊन १५ दिवस झाले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. यामुळे अनेक कामे रखडली आहेत आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

खडसे पुढे म्हणाले की, राज्यात पुराचा हाहा:कार आहे. गाव वाहून गेली आहेत. लोक निर्वासित झाली आहेत. जनावरे वाहून गेली आहेत. शेती पुराने वाहून गेली आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकारकडून कोणीही गेलेला नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना तातडीने मदत केली पाहिजे. पण सरकारकडे संवेदनशीलता राहिली नाही. 15 दिवस झाले हे सरकार जवेवणावळीत व्यस्त आहे. फाईव्हस्टार हॉटेलमद्ये आमदारांना घेऊन जाणं, जेवण देणं सुरू आहे. तिकडे फाईव्हस्टारमध्ये जेवण द्यायचे तर द्या. पण सर्वसामान्यांना दिलासा कोण देणार? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. चाललय काय? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ग्रामीण भागातील जनतेचं काही घेणंदेणं नसल्याचे दिसते. मंत्रिमंडळाचा विस्तारचं अद्याप झाला नसल्याने जनतेला दिलासा कोण देईल?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणावर शिक्कामोर्तब केला होता. तरीही शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामकरण करून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला आहे. पंधरा दिवसापासून मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेच सरकार चालवत आहेत. या दोघांच्या भरवश्यावर राज्य चालू आहे. जनता वाऱ्यावर आहे, असं ते म्हणाले.