फोगाटचे ऑलिम्पिक पदक हुकले; स्पर्धेत ठरविले अपात्र
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पॅरिस, (प्रबोधन न्यूज ) - भारताची विनेश फोगाट हिचे ऑलिम्पिक पदक हुकले आहे आणि तिला अपात्र ठरवले गेले. तिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवले आहे, कारण तिचे वजन काही ग्रॅम अधिक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश दाखल झाली आणि तिला आव्हानात्मक ड्रॉ मिळाला होता. पहिल्याच सामन्यात तिच्यासमोर टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई ससाकीचे आव्हान होते. पण, २९ वर्षीय भारतीय खेळाडूने अव्वल मानांकित ससाकीला चीतपट केले. त्यानंतर उपान्त्यपूर्व फेरीत माजी युरोपियन विजेत्या ओक्साना लिव्हाच हिचे आणि उपान्त्य फेरीत पॅन अमेरिकन्स स्पर्धेतील विजेती युस्रेलिस गुजमनचे आव्हान परतवून लावले.
भारतीय कुस्तीपटू ५० किलो वजनी गटात सहभागी झाली होती आणि तिचे वजन हे १०० ग्रॅम अधिक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली आहे. स्पर्धेतील नियमानुसार फोगाटला रौप्यपदकही मिळू शकत नाही. याबाबतची अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे तिला या स्पर्धेच्या शेवटी समाधानी रहावे लागले.
गेल्या सहा दिवसांपासून विनेश काहीही खात-पित नव्हती. सामन्यापूर्वी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त होते. ती राखणे तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते आणि तेच घडले. नियमानुसार स्पर्धेच्या दिवशी खेळाडूने त्याचे वजन कायम राखणे महत्त्वाचे आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार मंगळवारी रात्री तिचे वजन दोन किलो अधिक होते. ती संपूर्ण रात्र झोपली नव्हती आणि तिने नियमाचे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले.