जीतोच्या वतीने रविवारी अहिंसा रनचे आयोजन

जीतोच्या वतीने रविवारी अहिंसा रनचे आयोजन

चिंचवड (प्रतिनिधी) - महावीर जयंती निमित्ताने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो)च्या वतीने दि. २ एप्रिल रोजी शहरात सर्वधर्मीय "अहिंसा" मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड चॅप्टरचे अध्यक्ष मनिष ओसवाल, लेडीज विंगच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी दिली आहे.

दि २ रोजी सकाळी ६ वा चिंचवड पवना नगर येथील जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या मैदान येथून या मॅरेथॉन ला प्रारंभ होईल. बिजलीनगर- भेळ चौक- लाल बहादुरशास्त्री चौक-  निगडीतील कृष्णा हॉटेल पर्यंत पुन्हा याच मार्गाने चिंचवड च्या जैन शाळा मैदान या मार्गाने ही मॅरेथॉन होईल. १० किमी, ५ किमी, ३ किमी या तीन गटात ही मॅरेथॉन होईल. यावेळी जीतोचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

अहिंसा आणि शांतीचा संदेश देण्यासाठी देशातील ६८ तर विदेशातील जीतोच्या २६ चॅप्टरने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनची गिनीज बुक ऑफ़ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये सुमारे दोन हजार हून अधिक नागरीक धावणार आहे. सहभागी होणाऱ्या धावपटूना शर्ट, अल्पोपहार देण्यात येतील.