पेपर संपताच विद्यार्थ्यांची पर्यवेक्षकावर दगडफेक
मनमाडमध्ये पर्यवेक्षकांनी विद्यार्थांना कॉपी न करू दिल्याच्या रागातून पेपर संपताच विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांवर दगडफेक केल्याने पर्यवेक्षक रक्तबंबाळ.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मनमाड - मनमाडमध्ये एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या पेपरला कॉपी करू न दिल्याच्या रागातून पेपर सुटल्यानंतर पर्यवेक्षक शिक्षकावर दगडफेक करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू असून यंदा परीक्षा विभागाकडून एसएससी व एचएससी परीक्षेत ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविले जात आहे. मात्र या अभियानाचे तीन-तेरा वाजल्याच्या घटना नियमित समोर येत आहे. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात घडली आहे. एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या पेपरला कॉपी करू न दिल्याच्या रागातून पेपर सुटल्यानंतर पर्यवेक्षक शिक्षकावर दगडफेक करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (२० मार्च) रोजी घडली. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निलेश दिनकर जाधव (वय ३५) असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. निलेश जाधव हे छत्रे विद्यालयातील कला शिक्षक आहेत. राज्यात सध्या दहावी बोर्ड परीक्षेचे पेपर सुरू असल्याने निलेश जाधव यांना येथील एच.ए.के हायस्कूलमध्ये दहावीच्या पेपरसाठी पर्यवेक्षकाचे काम दिले होते. पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जमा करून बाहेर पडत असताना विद्यार्थ्यांच्या गर्दीतून नीलेश जाधव यांच्यावर दगड फिरकावले गेले.
त्यांच्या डोक्याला व डोळ्याला दगड लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. याच अवस्थेत त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मात्र हा हल्ला कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. परीक्षा सुरू असताना शिक्षकावरील हल्ला धक्कादायक आहे.
माझ्यावर परीक्षेदरम्यान सुपरव्हिजनचं काम सोपवण्यात आलं होतं. बोर्डाच्या नियमांनुसार मी माझं कामकाज करत होता. यावेळी मी विद्यार्थ्यांना कॉपी करु दिली नाही. याचा राग विद्यार्थ्यांच्या मनात होता. पेपर संपल्यानंतर शाळेच्या गेटजवळ गणवेशातील विद्यार्थांपैकी काहींनी दगडफेक केली. यात माझ्या डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणाची तक्रार मनमाड शहर पोलीस ठाण्यात केली आहे, अशी प्रतिक्रिया जखमी शिक्षक निलेश जाधव यांनी दिली.