देशातील पहिलं ऑक्सिजन पार्लर नाशिक रेल्वेस्टेशनवर सुरू
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नाशिक (प्रबोधन न्यूज) - देशातील प्रमुख शहरात औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचीही कमतरता भासू लागली. स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सीजन मिळणं काही शहरांमध्ये तर अवघड झाले आहे. पण हेच ऑक्सिजन 24 तास मिळण्यासाठी देशात पहिल्यांदाच नाशिक रेल्वे स्टेशनवर ऑक्सिजन पार्लर तयार करण्यात आले आहे. या ऑक्सिजन पार्लरची मोठी चर्चा सुरू आहेच शिवाय नागरिकही पाहण्यासाठी मुद्दाम भेट देण्यासाठी येथे येत आहेत.
24 तास सुरू असणाऱ्या ऑक्सिजन पार्लरमध्ये स्नेक,प्लांट आरेलिया, बुश, ड्रॅगन बांबू,चायनीज बांबू, मनीप्लांट, झामिया, झेड प्लांट, बोनझा, यासह एकूण 18 प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत. ही सर्व झाडं प्रदूषण दूर करून ऑक्सिजन जास्तीत जास्त तयार करण्याचं काम करत असतात. नासाच्या अभ्यासात देखील या झाडांचं महत्त्व सांगितलं आहे.
ऑक्सिजन पार्लरमधील एक झाड 10 बाय 10 च्या परिसरातील हवा शुद्ध करण्याचं काम करत असतं, 24 तास ही झाडे ऑक्सिजन तयार करण्याचं काम करतात. त्याचबरोबर या झाडांना आठ दिवसातून एकदाच पाणी द्यावं लागतं. अशी प्रतिक्रिया ऑक्सिजन पार्लर व्यवस्थापक अमित अमृतकर यांनी दिली आहे.
रेल्वेस्टेशन म्हंटलं तर प्रदूषण हे आलेच पण आता या ऑक्सिजन पार्लरमुळे नाशिकरोड रेल्वेस्टेशनचा परिसर प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या निम फ्रिज पॉलिसी अंतर्गत हा उपक्रम राबवला जात असून रेल्वे भाडे तसेच तिकीट विक्री व्यतिरिक्त रेल्वेला या माध्यमातून नफाही मिळणार आहे. अशाप्रकारचे पार्लर असणारे नाशिकरोड रेल्वेस्टेशन हे पहिलेच असे स्टेशन आहे.
या ऑक्सिजन पार्लरमुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना ही वेगळीच अनुभूती येते. ऑक्सिजन पार्लर बघताच प्रवाशी आवर्जून त्या ठिकाणी बघण्यास जातात. त्यामुळे नाशिक रोड रेल्वे स्टेशन प्रशासनाने राबवलेला हा प्रयोग खरोखर उल्लेखनीय आहे. प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या इतर शहरांमधील रेल्वे स्टेशन परिसरात ही असा प्रयोग राबवावा म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती होईल, असं लोकांकडून म्हटलं जात आहे.