देश - विदेश

अगोदरच सांगितले होते, मुस्लिम एरियात जाऊ नका – ममता बॅनर्जी

रामनवमीच्या दिवशी देशात प. बंगाल, गुजरात, उ. प्रदेश व महाराष्ट्रमध्ये दोन समुदयातील वादानंतर दंगल उसळली होती. बंगालमधील हिंसाराबद्दल ममता बॅनर्जींनी हिंदूंना दोषी ठरवले आहे.

भाजपचा आमदार विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहताना पकडला गेला

भाजपचा एक आमदार विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहत असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.

रामनवमीच्या दिवशी वडोदरात मिरवणुकीवर दगडफेकीनंतर तणाव

गुजरातमधील वडोदरा येथे रामनवमीच्या दिवशी जातीय हिंसाचार उसळला होता. शहरात मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सावरकर वादावरून शरद पवारांनी केली राहुल गांधींची कानउघाडणी

शरद पवार म्हणाले, “सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकर माफीवीर म्हणणं योग्य नाही.”

राम नवमी सोहळा सुरु असताना मंदिराच्या विहिरीत 25 जण बुडाले

इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. मंदिरातील विहीर पटेल नगर येथील झुलेलाल मंदिराच्या पायरीवरील छत कोसळल्याने अनेकजण आतमध्ये पडले आहेत. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.

मजुराच्या बँक खात्यावर चुकून पैसे जमा झाले, मोदींनी पैसे दिल्याचा समज

बीडी कामगाराच्या बँक खात्यावर चुकून दुसऱ्याच एका महिलेचे पैसे जमा झाले. कामगाराला वाटले पंतप्रधान योजनेतून पैसे मिळाले. आता पर्यंत १ लाख रुपये खर्च करून बसला.

आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ!

केंद्रातील मोदी सरकारने एक गुड न्यूज दिली आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याला आता मुदतवाढ मिळाली आहे. ३० जून २०२३ पर्यंत ही मुदतवाढ आहे. आधी ३१ मार्च २०२३ पर्यंत डेडलाइन ठरवली गेली होती.

राहुल गांधींच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर येत नसल्याने चिदंबरम नाराज

राहुल गांधी यांच्यासाठी लोक रस्त्यावर येत नाहीत आणि त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे, असे पी चिदंबरम म्हणाले. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून जनता कोणत्याही प्रश्नासाठी रस्त्यावर येत नाही.

बापरे ! केळी 500 रुपये डझन आणि द्राक्षे 1600 रुपये किलो

सध्या रमजानचा काळ सुरू आहे. या काळात मुस्लिम बांधव उपवास करतात. मात्र पाकिस्तानमध्ये महागाईने कळस गाठला आहे. केळी ५०० रुपये डझन व द्राक्षे १६०० रुपये भावाने विकली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपवास करणे अवघड झाले आहे.

राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आव्हान

या तरतुदीमुळे निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग होतो, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी न्यायालयांनी दोषी ठरवले तर ते अपात्र ठरू शकते.

राहुल गांधींवरील कारवाई विरोधकांच्या पथ्यावर

एरवी काँग्रेसला विरोध करणारे पक्षही या मुद्द्यावरून काँग्रेसच्या बाजूने उभे राहत असल्याचे चित्र या घटनेने निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान (फोटो गॅलरी)

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.

राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; वरच्या कोर्टात जाण्यासाठी जामीन

'सर्व चोरांची आडनावं मोदीच का असतात?,' असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यामुळे मोदी आडनावाची बदनामी झाल्याबद्दल खटला चालू होता.