कुस्तीपटू, पोलीस कॉन्स्टेबल ते मिस महाराष्ट्र ! बीडच्या पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा सांगळे यांचा प्रेरणादायी प्रवास !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कुस्तीपटू, पोलीस कॉन्स्टेबल ते मिस महाराष्ट्र ! बीडच्या पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा सांगळे यांचा प्रेरणादायी प्रवास !
बीड - 
बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकावलाय. कुस्तीपटू, पोलीस कॉन्स्टेबल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.

बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे या 'मिस महाराष्ट्र' ही स्पर्धा जिंकल्यानंतर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. पोलीस दलात कार्यरत असतानाच त्यांनी मिस महाराष्ट्र हा किताब पटकावलाय. प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील असून त्या २०१० सालापासून बीडच्या पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या त्या पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत.

प्रतिभा यांना मागील अनेक वर्षांपासून एखाद्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. त्या आपल्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बराच प्रयत्न करत होत्या. अखेर त्यांनी डिसेंबरच्या अखेरीस पुण्यात पार पडलेल्या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अपचा किताब पटकावत 'मिस महाराष्ट्र' स्पर्धेपर्यंत आणि तिथून पुढे थेट जेतेपदापर्यंत मजल मारली आहे. केवळ पोलीस दलच नाही तर सांगळे यांनी कुस्तीचे मैदानही चांगल्या प्रकारे गाजवले आहे. यापुढे 'मिस इंडिया युनिव्हर्स'चे स्वप्न उराशी बाळगून प्रतिभा यांनी आपली तयारी पुढे सुरू ठेवलीय.

'माझे आजोबा कुस्तीपटू होते. त्यांच्याकडून पाहून मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी कुस्तीच्या रिंगणात उतरले. मी पोलीस दलामध्ये खेळाडू म्हणून जॉइन झाले. त्यानंतर लहानपणी शाळा, गॅदरींगमध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळे तेव्हाचे जे छंद होते ते आता जोपासले पाहिजे असं वाटलं. त्यातूनच सौंदर्य स्पर्धेकडे मी वळले,' असं प्रतिभा यांनी म्हटलं आहे. बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. येथे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण फारच कमी आहे. मी पालकांना आवाहन करु इच्छिते की मुलीचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांचं लग्न करु नका,असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच मुलींचा बालविवाह केला जाऊ नये यासाठी आपण जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.