पिंपरी चिंचवड महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली - जयंत पाटील - शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित भोसरीतील सभेत गंभीर आरोप

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी चिंचवड महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली - जयंत पाटील
- शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित भोसरीतील सभेत गंभीर आरोप
भोसरी , (प्रबोधन न्यूज ) - नगरपरिषदा, महानगरपालिका नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून निर्माण झाल्या. मात्र सध्या जाणीवपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबविल्या जात आहेत. स्थानिक आमदार आपल्या सोयीने येथे अधिकारी आणतात. यातून मनमानी कारभार केला जातो. अशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड पालिकेचाही कारभार सुरू असून सध्याच्या घडीला पिंपरी चिंचवड पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार करत शुक्रवारी (दि. 9) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली. यात्रा सध्या भोसरी पर्यंत पोहोचली असून भोसरीमध्ये यात्रेचे रूपांतर सभेत झाले. यावेळी  जयंत पाटील बोलत होते. सभेला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे,  युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, शहराध्यक्ष तुषार कामठे,  माजी महापौर आझमभाई पानसरे, मोहिनी लांडे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, 
ज्येष्ठ नेते  रविकांत वर्पे, माजी नगरसेवक गिता मंचरकर, गणेश भोंडवे, धनंजय भालेकर, प्रविण भालेकर,संजय नेवाळे, पंकज भालेकर,समिर मासुळकर, सुधीर मुंगसे,तानाजी खाडे,देवेंद्र तायडे, विशाल काळभोर,ज्ञानेश आल्हाट, प्रदीप तापकीर, संजय उदावंत, विशाल जाधव आदी उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले , महाराष्ट्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे ताकदीने उभा आहे. हे आपण लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने पाहिले. महाराष्ट्रातील 48 पैकी 31 जागांवर भाजपला नागरिकांनी नाकारले. याचे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार हे होते. भाजपचे लोक देशाची घटना बदलायला निघाले होते याची खात्री नागरिकांना पटली. विधान परिषदेत अनेकदा अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर एकाही मंत्र्याला उत्तर देता आले नाही.  महाराष्ट्रात भ्रष्टाचार अक्षरशः कळसाला पोहोचला आहे. हेच पिंपरी चिंचवड महापालिकेतही दिसून येत आहे म्हणूनच लोकसभेला परिवर्तनासाठी नागरिक पुढे आले तसेच परिवर्तन विधानसभेलाही होणार आहे.
अमोल कोल्हे यांनी सभेमध्ये बोलताना भोसरी विधानसभेतील आमदारांचा खरपूस समाचार घेतला.  नाशिक फाटा ते चांडोली कॅरीडोरबद्दल बोलताना ते म्हणाले या कामासाठी सुरुवातीपासून मी जो खर्च सांगितला आजही तो आकडा तेवढाच आहे.मात्र भोसरीमध्ये जादू होते. भोसरीतील शितल बाग येथील पादचारी पुल 70 लाखावरून सात कोटीचा कसा झाला. पालिकेच्या दीडशे शाळांच्या ई लर्निंगच्या 43 कोटीच्या कंत्राटाचे काय झाले. अर्बन स्ट्रीटसाठी 45 कोटी घालून एका नाहक निष्पाप जीवाचा बळी जातो. एकीकडे इंद्रायणी थडी भरवायची, दुसरीकडे नमामि इंद्रायणी म्हणत इंद्रायणी माईच्या नावाखाली पैसे लाटायचे. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी तब्बल 1400 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत असे असतानाही दर दिवशी इंद्रायणी नदी फेसाळत असेल तर कोणत्या एसटीपी प्लांट मधून पाणी प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते हे देखील पहावे लागेल. माझ्या कामात कुणी लक्ष घालत असेल तर मलाही त्यांच्या कामात लक्ष घालावे लागेल असे म्हणत त्यांनी एक प्रकारे भोसरीतील स्थानिक आमदारांना इशारा दिला.असा कारभार करण्यासाठी मोकळे रान मिळावे म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवल्या जात आहेत आणि याबाबत गेली 14 वर्ष पालकमंत्री असलेले चकार शब्द बोलत नाही . पालकमंत्री या कारभाराची चौकशी लावणार का असेही कोल्हे यावेळी म्हणाले.
तुषार कामठे म्हणाले शहराचे महायुतीच्या कारभाऱ्यांनी दोन तुकडे केले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहराचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे.अजित गव्हाणे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वामुळे पक्षाची ताकद आता आणखी वाढणार आहे.
अजित गव्हाणे यांनी आपल्या भाषणात भोसरीतील आमदारांवर जोरदार टीका केली.गव्हाणे  म्हणाले आशिया खंडात ज्या महापालिकेचा श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकिक होता. दुर्दैवानं आज या महापालिकेची ओळख सर्वात भ्रष्टाचारी महापालिका म्हणून होत आहे. याला येथील स्थानिक आमदार कारणीभूत आहेत. म्हणूनच आता जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे आणि जनतेने ठरवलं आहे की आता शहरातील तीनही आमदार बदलायचे आहेत. त्यामुळे लोकांनी आता ठरवले आहे की शहरांमध्ये परिवर्तन घडवायचे आहे. यशवंतराव चव्हाण ते शरद पवार यांनी या शहराची एक वेगळी ओळख निर्माण करून ठेवली होती. औद्योगिक नगरी म्हणून या शहराची भरभराट केली. औद्योगिकिकरणाला पोषक वातावरण निर्माण केलं. महाराष्ट्रात शहराची एक वेगळी ओळख निर्माण झाली.  मात्र या शहराला अधोगतीच्या मार्गावर नेण्याचं काम येथील आमदारांनी केले आहे. राजकारणात काम करताना आम्ही आमचा व्यवसाय वेगळा ठेवला. मात्र येथील आमदारांनी राजकारणाचा व्यवसाय केला असल्याची घणाघाती टीका देखील गव्हाणे यांनी केली.म्हणूनच येथे परिवर्तन गरजेचे आहे. शहरातल्या तिनही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या विचाराचे आमदार निवडून आल्यानंतर पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्याचा निश्चितच फायदा होणार आहे असेही गव्हाणे म्हणाले.
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेमध्ये अजित गव्हाणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी बद्दलचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. गव्हाणे म्हणाले जाणीवपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवल्या जात आहे. महानगरपालिका नगरपालिकांमध्ये सदस्य नसल्याने महायुतीचे फावले आहे. हेच चित्र पिंपरी चिंचवड महापालिकेत आहे स्थानिक आमदारांनी मन मानेल त्या पद्धतीने कारभार केला त्यामुळे संपूर्ण शहर खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे. 
देर आये मगर दुरुस्त आये
जयंत पाटील सभेत म्हणाले अजित गव्हाणे तुम्ही यायला उशीर का केला? तुम्ही थोडे लवकर आमच्याकडे आला असता तर शिरूर मतदार संघाचे  भोसरीतील घटलेले साडेआठ हजाराचे लीड वीस पंचवीस हजारांनी वाढले असते. पण ठीक आहे देर आये मगर दुरुस्त आये.
वगनाट्याने आणली रंगत
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित वगनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री अशा भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर वगनाट्यातून भाष्य करत एकच रंगत आणली.