तुर्की महिलेने भारतीय लष्करी अधिकाऱ्याला मिठी मारतानाचा VIDEO VIRAL
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली (वृत्तसेवा) - तुर्कीस्तानमध्ये भूकंपानंतर बचाव आणि मदत कार्यादरम्यान एका तुर्की महिलेने भारतीय लष्कराच्या महिला जवानाच्या गालावर चुंबन घेतल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तीन शक्तिशाली भूकंपांनी तुर्की आणि सीरिया पूर्णपणे उद्ध्वस्त केले. काळाच्या गालात हजारो जीव गळून गेले. नगर शहरे उध्वस्त झाली. काहींनी वडिलांची सावली गमावली, काहींनी आपल्या आईचं छत्र गमावलं, तर काहींचे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्यात अडकले. मृतदेह बाहेर काढण्याचे काम अद्याप सुरू आहे.
सध्या व्हायरल होत असलेला हा फोटो ADG PI च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलाय. “आम्ही काळजी घेतो” अशी कॅप्शन देत हा फोटो शेअर करण्यात आलाय, हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करू लागले आहेत.
भारतासह जगातील अनेक देश आपआपसातील मतभेद विसरून तुर्कीस्तान आणि सीरियाला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. भारताने या दोन देशांतील लोकांना वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे केलाय. दरम्यान, एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये एक तुर्की महिला भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याला मिठी मारताना दिसत आहे. भारतीय लष्करातील अधिकारी म्हणजे मेजर बिना तिवारी या नुकत्याच ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत तुर्कीला गेल्या आहेत.
तुर्कीस्तानमध्ये मदत आणि बचाव कार्यात सहभागी असलेल्या भारतीय एनडीआरएफच्या पथकाने गंजियातेपमधील ढिगाऱ्यातून सहा वर्षांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढले. मुलीची सुखरूप सुटका झाल्याचा व्हिडीओ शेअर करत गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विट केलंय. या ट्विटमध्य त्यांनी लिहिलंय की, “या नैसर्गिक आपत्तीत आम्ही तुर्कीसोबत आहोत. भारताचे NDRF जमिनीच्या पातळीवर बचाव आणि मदत कार्य करत आहे. भारतीय संघाने आज गंजियातेपमधील नूरदगी येथून एका सहा वर्षांच्या मुलीला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले.”
सोमवारी झालेल्या तीन शक्तिशाली भूकंपात तुर्कस्तान आणि सीरियामधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली. जगातील अनेक देशांनी तेथे मदतकार्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने सोमवारी १०० NDRF शोध आणि बचाव पथके, वैद्यकीय पथके आणि मदत सामग्री तुर्कीला तत्काळ पाठवण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्तानला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचनांनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘या आव्हानात्मक क्षणी भारत आपली एकता व्यक्त करतो.’
https://twitter.com/adgpi/status/1623647044601782272/photo/1