आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती कार्यक्रमास परवानगी नाकारली, शिवप्रेमी संतापले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
आगाखान, अदनान सामी चालतात, मग शिवजयंती का नाही?
नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आग्रा किल्ला परिसरात आयोजित शिवजयंती कार्यक्रमाला पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली आहे. यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. आग्रा किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांना दिली जाते, मग शिवजयंती बाबत भेदभाव का असा प्रश्न विचारत शिवप्रेमींनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांना आग्रा येथील किल्ल्यात नजरकैदेत ठेवलं होतं. या किल्ल्यातून शिवाजी महाराजांनी शिताफीनं स्वत:ची सुटका करुन घेतली होती. या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आग्र्याचा ऐतिहासिक लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार होती. मात्र, पुरातत्व खात्याने ही परवानगी नाकारली. याच किल्ल्यात या पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात होती.माग शिवजयंतीलाच का विरोध असा सवाल करत शिवप्रेमींनी पुरातत्त्व विभागाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आग्र्याच्या किल्ल्यामध्ये यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच गायक अदनान सामीच्या कार्यक्रमालाही परवानगी देण्यात आली होती. यामुळे विनोद पाटील यांनी संताप व्यक्त केला असून ऐतिहासिक संबध नसणाऱ्यांना परवानगी दिली जाते. पण किल्ल्याच्या इतिहासाठी जोडले गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली जात आहे? अशी विचारणा केली आहे.
पुरातत्व विभागाने परवानगी नाकारताना त्यामागील कारणाचा खुलासा केलेला नाही. सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्याबद्दल कोणतीही नियमावली नसताना पुरातत्व विभाग परवानगी नाकारत मनमानी कारभार करत असल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पार पडावा यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रयत्न केले होते. त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना शिफारस पत्र दिलं होतं. मात्र तरीही परवानगी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.