रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला कारची धडक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला कारची धडक

 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धाला भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिली. त्यात वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 27) सकाळी साडेसहा वाजता इंद्रायणी चौक, इंद्रायणी नगर, भोसरी येथे घडली.

कांतीलाल भाऊराव कदम (वय 78, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी कांतीलाल यांच्या मुलीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल जोसेफ लोंढे (वय 34, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील इंद्रायणी नगर, मधील इंद्रायणी चौकात रविवारी सकाळी पायी चालत जात होते. ते रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या कारने फिर्यादी यांच्या वडिलांना धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला, कपाळाला, दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.