देशातील विविध सैन्य शाळांमध्ये आठ हजारांपेक्षा जास्त भरती ! त्वरित करा अर्ज
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत देशातील विविध सैन्य शाळांमध्ये ८ हजारहून अधिक शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत टीजीटी, पीजीटी आणि पीआरटी पदांसाठी अर्ज प्रक्रिया २८ जानेवारी २०२२ रोजी बंद केली जाईल. शिक्षक म्हणून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी चालून आली आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण ८७०० पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीसाठी अद्याप अर्ज न केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाइटवर उपलब्ध असलेले नोटिफिकेशन पाहणे गरजेचे आहे.
आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत देशभरातील शाळांमध्ये शिक्षक पदांच्या एकूण ८७०० जागा भरण्यात येणार आहेत. पीजीटी, टीजीटी आणि टीआरटी ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी परीक्षा, मुलाखत आणि शिकविण्याचे कौशल्य या तीन टप्प्याने भरती केली जाणार आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. यासोबतच बीएड आणि किंवा एलिमेंट्री एज्युकेशनचा दोन वर्षांचा डिप्लोमा ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज
स्टेप्स १: अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- awesindia.com वर जा.
स्टेप २: होमपेजवर What’s New या लिंकवर जा.
स्टेप ३: आता नवीन नोंदणीच्या लिंकवर जा.
स्टेप ४: आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ५: मागितलेली तपशील भरून नोंदणी करा.
स्टेप ६: नोंदणी क्रमांकाच्या मदतीने अर्ज भरा.
फ्रेशर उमेदवारांसाठी ४० तर अनुभवी उमेदवाराचे वय ५७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. ७ जानेवारीला यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना २८ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
१० फेब्रुवारी २०२२ रोजी प्रवेशपत्र जाहीर होणार आहे. १९ आणि २० फेब्रुवारी २०२२ रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर होणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.