नाशिक जिल्ह्यातील 400 विद्यार्थ्यांनी लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; जाणून घ्या कशासाठी ? 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नाशिक जिल्ह्यातील 400 विद्यार्थ्यांनी लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; जाणून घ्या कशासाठी ? 
नाशिक -
नाशिक जिल्ह्यातल्या तब्बल 400 विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात मालेगावच्या काकाणी विद्यालयातील विद्यार्थी आणि मुसळगाव येथील जिल्हा परिषद‎ शाळेच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून संवाद साधला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम राबण्यात आला.

सध्या देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. या ऐतिहासिक अभिमानास्पद वर्षानिमित्त मालेगाव पोस्ट खात्याने एक अनोखी मोहीम राबवली आहे. खरे तर इंटनेट, मेल, फेसबुक, ट्वीटर ते व्हॉट्सऍपच्या जमान्यात पत्राचे महत्त्व जवळपास नाहीसेच झाले आहे. हेच ध्यानात घेत टपाल विभागाने ही मोहीम सुरू केली. भारतीय स्वातंत्र्याच्या‎ अमृत महोत्सवानिमित्त 75 लाख पोस्टकार्ड, असे या मोहिमेचे स्वरूप आहे. त्यात 1 ते 25 डिसेंबरदरम्यान, ‘स्वातंत्र्यलढ्यात न गौरविलेले‎ क्रांतिकारक’ व ‘2047 मध्ये माझ्या‎ नजरेतील भारत कसा असेल’ दोन्हीपैकी एका विषयावर पंतप्रधानांना पत्र लिहायचे आहे.

मालेगाव टपाल कार्यालयाचे‎ मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काकाणी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेत पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. या अनोख्या मोहिमेसाठी विद्यालयाच्या‎ मुख्याध्यापिका शोभा मोरे, पर्यवेक्षक‎ राजेश परदेशी, प्रमोद देवरे, नंदू गवळी, वैशाली साळुंखे, सरोज बागुल तसेच इतर सर्व सहकारी‎ शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही आपल्या परिसरातील विविध क्रांतिकारक यांच्याविषयी पंतप्रधानांना पत्र लिहून माहिती दिली आणि आपल्या स्वप्नातील भारत कसा असावा, याविषयी आपले मत व्यक्त केले आहे.

सिन्नर तालुक्यातल्या मुसळगाव जिल्हा परिषदेच्या 75 विद्यार्थ्यांनीही या मोहिमेत सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी 2047 मधील आपल्या स्वप्नातील भारत कसा असावा, याची मते कळवली आहेत. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी,‎ हिंदी व इंग्रजी भाषेत पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. तर काही विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर चित्रे काढून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या मोहिमेसाठी पोस्टमास्तर मयुरी नवगिरे, मुख्याध्यापक विजय क्षीरसागर‎, वसंत गोसावी, अनिता‎ येवले, उषा चव्हाण, वैशाली सायाळेकर,‎ जितेंद्र नंदनवार, रंजना उबाळे आदींनी परिश्रम घेतले आहेत.