केंद्राच्या हिटलरशाहीला आता सर्वोच्च न्यायालयाने चाप बसवावा – नाना पटोले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

केंद्राच्या हिटलरशाहीला आता सर्वोच्च न्यायालयाने चाप बसवावा – नाना पटोले

मुंबई, दि. 31 मार्च नागपूरमध्ये वकील सतीश उके यांच्याविरोधात ईडीने कारवाई करून त्यांना व त्यांच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की काहीही कारण नसताना ईडीने उके यांच्याविरोधात कारवाई केली आहे. उके यांनी माझे वकीलपत्र घेतले म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला का असा सवाल करीत राष्ट्रविरोधी धोरणाविरुद्ध व समाजविरोधी धोरणाविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जात आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. आता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनीच या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी विनंती काँग्रेसतर्फे करत असल्याचे नाना पटोले म्हणाले.

पटोले पुढे म्हणाले की, फोन टॅपिंग प्रकरणात सतीश उके वकील म्हणून माझी बाजू मांडत होते. पण याचा अर्थ ते काँग्रेसचे वकील झाले असा होत नाही.. तसेच, जज लोया मृत्यूप्रकरणासह अनेक प्रकरणांमध्ये सतीश उके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. म्हणून घरातून त्यांची कागदपत्रे जमा करण्यात आली. भाजप आता ईडीचा वापर वकिलांच्या फाईली जप्त करण्यासाठी करत आहे. ईडीचा एवढा दुरूपयोग पूर्वी झाला नव्हता, अशी टीकाही पटोले यांनी केली आहे.

काय प्रकरण आहे नेमके पाहूयात....

अत्यंत संवेदनशील प्रकरण असलेल्या न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी सतीश उके यांनीच उच्च न्यायालयात धाव घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी तक्रारदेखील नागपूर येथील वकील सतीश उके यांनी नागपूर सत्र न्यायालयाकडे केली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुक प्रतिज्ञापत्रात फडणवीसांनी आपल्यावर असलेला गुन्हा लपवला, अशी तक्रार उके यांनी केली होती. 

सतीश उके यांना आज ईडीनं ताब्यात घेतलं आहे. पहाटे पाच वाजताच ईडीचे पथक उके यांच्या घरी धडकले होते. तब्बल सहा तास त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर पावणे अकराच्या सुमारास ईडीनं त्यांना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकीलपत्रदेखील सतीश उके यांनीच घेतलं आहे.  

सतीश उके यांच्यासोबत त्यांचे मोठे भाऊ प्रदीप उके यांनाही इडीनं ताब्यात घेतले आहे. ते देखील वकील आहेत. नेमक्या कोणत्या प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली, याबाबत अद्याप ईडीकडून माहिती देण्यात आलेली नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच नागपूरमधील एका वृद्ध महिलेनं सतीश उकेंविरोधात जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी महिलेनं पोलिसांत गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून सुरू आहे. आजची इडीची कारवाई याच अनुषंगानं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजप नेत्यांविरोधात आरोप करत असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. तर नेमक्या कोणत्या प्रकरणावरून ही कारवाई करण्यात आली याबाबत अजून स्पष्ट माहिती नसली तरी केंद्रीय यंत्रणा कोरड्याचे ओले व ओल्याचे कोरडे असे काहीही करू शकतात, अशी भीतीही उके यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.