विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची १९ जुलैला मुंबईत बैठक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नागपूर , (प्रबोधन न्यूज ) - लोकसभेच्या निकालानंतर प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. १९ जुलै रोजी मुंबईतील टिळक भवनात राज्यभरातील शहर व जिल्हाध्यक्षांसह प्रदेश पदाधिका-यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून तीत विधानसभा निवडणुकीची रणनिती आखली जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यभरातून मागविण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचाही आढावा घेतला जाणार आहे.
ही बैठक १२ जुलैै रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्या दिवशी विधान परिषदेची निवडणूक असल्याने एक आठवडा पुढे ढकलण्यात आली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, आरिफ नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील उपस्थित राहतील. या बैठकीला जिल्हा प्रभारी व विविध आघाडी व सेलच्या प्रमुखांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, असे प्रदेश उपाध्यक्ष (प्रशासन व संघटन) नाना गावंडे यांनी कळविले आहे.