आमदार अमित गोरखे यांचे तहसीलदारांना आदेश तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आमदार अमित गोरखे यांचे तहसीलदारांना आदेश तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी
आमदार अमित गोरखे यांचे तहसीलदारांना आदेश तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी,*
     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी पिंपरी गाव फुगेवाडी मोरवाडी, लालटोपी नगर, दापोडी सखल भागात नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे या नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी दिले आहेत.
संपूर्ण पुणे जिल्ह्यात गेली 3 ते 4 दिवस सलग अतिवृष्टी होत आहे, नागरिकांचे दैनंदिनी व्यवहार ठप्प झाले आहे. अशातच पिंपरी चिंचवड शहरात कासारवाडी, पिंपरी गाव, फुगेवाडी, मोरवाडी, दापोडी, भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. या अशा अस्मानी संकटाच्या वेळी नागरिकांचे प्रचंड हाल झाले, लोकांचे सौंसार उघड्यावर आले, काही भागात घराच्या भिंती ढासळलेल्या आढळून आल्या या सर्व पूरग्रस्त भागाचा नवनिर्वाचित विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी पाहणी केला असता, तहसीलदारांना तातडीने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून नागरिकांना मदत करण्याचे आदेश दिले, 
अतीवृष्टी मुळे विद्युत पुरवठा ही मोठ्या प्रमाणात खंडित  झाला असून विद्युत वाहिन्या ही उघड्यावर आल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, यावर शासन प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडवाव्या. अशा प्रकाराचे आदेश या वेळी आमदार अमित गोरखे यांनी प्रशासनाला दिले. तसेच या पुढे नागरिकांनी पुढचे काही दिवस सतर्क राहावे असेही यावेळी अमित गोरखे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले.