पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मदत कार्य करण्यासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप "ऑन फिल्ड"

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मदत कार्य करण्यासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप "ऑन फिल्ड"



पिंपरी :, (प्रबोधन  न्यूज ) - मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात नागरिकांच्या घरात आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले. पावसामुळे शहरात उद्भवलेल्या परिस्थितीची भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी गुरूवारी पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. रावेत, नवी सांगवी व इतर भागातील परिसरात भेट देत नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन शंकर जगताप यांनी केले.  

दोन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी  शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. पाऊस सतत सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच पवना आणि मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी आणखी वाढणार आहे. या सर्व परिस्थितीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी गेले आहे.

पावसामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्यापर्यंत महापालिकेची मदत पोहोचविण्यासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक भागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. नवी सांगवी, रावेत या भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता पावसामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी तत्परतेने काम करीत आहे. प्रत्यक्ष जागेवर नागरिकांना मदत कशी पोहोचविता येईल यासाठी काम करीत आहेत. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. कोणत्याही वेळी लागणारी मदत पोहोचविण्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. 

त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून अडचणीत असलेल्या नागरिकांपर्यंत तातडीने आवश्यक ती मदत पोहोचविण्यास शंकर जगताप यांनी सांगितले. तसेच पावसामुळे आरोग्याच्या कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी खबरदारी घ्यावी. त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी आयुक्त व इतर अधिकाऱ्यांना सांगितले.