बुटक्या मुलींसाठी 'हे' पाच फॅशन ट्रेंड ! दिसा ब्युटीफुल आणि कॉन्फिडन्ट !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बुटक्या मुलींसाठी 'हे' पाच फॅशन ट्रेंड ! दिसा ब्युटीफुल आणि कॉन्फिडन्ट !

नवी दिल्ली - 

सध्या प्रत्येक मुलीला स्टायलिश आणि फॅशनेबल दिसायचे असते. यासाठी मुली लेटेस्ट फॅशन ट्रेंडचा अवलंब करतात. यासाठी तरुण मुलीच नाही तर मध्यमवयीन महिलादेखील डिझायनर आउटफिट्सपासून ते अभिनेत्रींच्या ट्रेंडी लुकची कॉपी करतात. अनेक वेळा मुली अशा पोशाखांची निवड करतात, जे लेटेस्ट फॅशनचे तर असतात, पण त्यांना कमी उंचीमुळे ते सूट करत नाहीत. तसे पाहता उंच आणि बुटक्या मुलींच्या ड्रेसिंग शैलीमध्ये फरक आहे. सौंदर्य किंवा आकर्षक लूक मिळवण्यासाठी फॅशन ट्रेंड फॉलो करताना कमी उंचीच्या मुली ज्या ड्रेस किंवा स्टाइल वापरणार आहेत, त्यावरून त्यांची उंची कमी दिसली नाही पाहिजे, याची काळजी घ्यायला हवी.  चला तर, आज कमी उंचीच्या मुलींना अशा फॅशन ट्रेंडबद्दल सांगणार आहोत जे त्यांनी अजिबात फॉलो करू नये. 

० कमी उंचीच्या मुलींनी 'हा' ड्रेस आवर्जून घाला 
बर्‍याच मुलींना मिडी ड्रेस किंवा स्कर्ट घालायला आवडते पण असा ड्रेस कॅरी करण्यापूर्वी मुलींनी आपली उंची लक्षात घेतली पाहिजे. बुटक्या मुलींनी मिडी ड्रेस किंवा स्कर्ट घालू नयेत. हे तुम्हाला आणखी ठेंगणे दाखवेल. जर तुम्हाला मिडीच घालायची असेल तर तुम्ही शॉर्ट स्कर्ट किंवा फुल लाँग लेन्थ स्कर्ट घालू शकता. यामध्ये तुमचे पाय लांब दिसतील आणि उंची अधिक वाटेल. 
० उंची जास्त दिसण्यासाठी वापरा 'ही' जीन्स 
कमी उंचीच्या मुलींनी त्यांच्या कपड्यांच्या निवडीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तुम्ही जीन्स परिधान करत असाल तर मोठ्या साईजची जीन्स घालणे टाळा. या प्रकारची जीन्स आरामदायक असू शकते परंतु ती तुमची उंची लपवते. अशा परिस्थितीत बुटक्या मुलींची उंची आणखी कमी भासेल. जर तुम्हाला जीन्स घालायची असेल तर हाय वेस्ट जीन्स निवडा. या जीन्समुळे तुम्ही अधिक उंचीच्या दिसाल. 

० हेअरस्टाईल काळजीपूर्वक निवडा 
ज्या मुलींची उंची कमी आहे, त्यांनी हेअरस्टाइलकडेही लक्ष दिले पाहिजे. कमी उंचीच्या मुलींना लांब केस नसावेत. या मुलींनी शक्यतो मध्यम आकाराचे किंवा लहान केस ठेवले पाहिजे. या प्रकारचे हेअरकट तुमच्या नेक लाईनला हायलाइट करते आणि तुमचा लुक अधिक आकर्षक बनवते.

० 'या' आकाराची बॅग वापरा
अनेकदा मुली त्यांचा लूक स्टायलिश बनवण्यासाठी ट्रेंडी पर्स आणि बॅग वापरताना दिसतात. मुलींनी आउटफिटनुसार बॅग निवडताना आपल्या उंचीचाही विचार केला पाहिजे. ठेंगण्या मुलींनी मोठ्या आकाराच्या बॅग्ज बाळगू नयेत. त्यामुळे तुमची उंची कमी दिसते. तुम्ही मध्यम आकाराच्या बॅग्ज किंवा पर्स वापरू शकता. 

* फुटवेअर असावे 'असे'
बुटक्या मुलींनी त्यांचे फुटवेअर निवडताना राउंड टो हिल्स वापरणे टाळावे. यामुळे तुमचे पाय लहान दिसू शकतात. त्याऐवजी कमी उंचीच्या मुलींनी पॉईंटेड टो हिल्स घालावेत. हे तुम्हाला स्टायलिश लुक देखील देईल आणि तुम्ही उंचही दिसाल.