क्युआर कोडची आता गरज राहणार नाही, गुगल पे कडून नवीन फिचर लॉन्च

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

क्युआर कोडची आता गरज राहणार नाही, गुगल पे कडून नवीन फिचर लॉन्च

देशात डिजिटल क्रांती (Digital Revolution) झाल्याने आर्थिक व्यवहार करणं सोपं झालं आहे. त्यातच, युपीआय (UPI Payment) सुविधेमुळे मोबाईल बँकिंगचा उदय झाल्याने व्यवहार सुकर झाले आहेत. गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay), पेटीएमसारख्या (Paytm) युपीआय अॅपमधून सहज पैसे ट्रान्सफर केले जातात. वैयक्तिक वापरासाठी हे अॅप उपयुक्त तर आहेतच, शिवाय छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनाही या माध्यमातून सहजतेने व्यवहार करता येतात. म्हणूनच, अनेक बँकिंग अॅप आता आपल्या तंत्रज्ञानात बदल करून अपडेट होत आहेत. (New feature launched by google pay tap to pay)

ऑनलाईन व्यवहारासाठी सर्वाधिक वापरले जाणरे गुगल पे अॅपनेही आता अशीच अद्ययावत कार्यप्रणाली सुरू केली आहे. टॅप टू पे (Tap to Pay) असं या नव्या फिचरचं नाव असून यापुढे कोणताही व्यवहार करताना तुम्हाला क्युआरकोडची गरज नसून केवळ पीओएस मशीनवर टॅप केल्यास तुमचा व्यवहार पूर्ण होईल.

स्मार्टफोनमध्ये एनएफसीची सुविधा असेल तर टॅप टू पे हे फिचर तुम्ही विनासायस वापरू शकतात. यामुळे एकाच टॅपमध्ये तुमचा व्यवहार पूर्ण होणार आहे. व्यवहार सहज करता यावेत याकरता हे फिचर लॉन्च केलं असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

  • अनेक क्रेडिट कार्डवर टॅप टू पेचा पर्याय उपलब्ध असतो. त्याच धर्तीवर कंपनीने ही सुविधा उपलब्ध केली आहे. पाइन लॅबच्या सहाय्याने हे फिचर लॉन्च करण्यात आलं आहे.
  • आतापर्यंत आपण गुगल पेच्या माध्यमातून व्यवहार करताना संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर किंवा क्युआर कोडवर स्कॅन करून पैसे पाठवले जायचे. आता नव्या फिचरनुसार तुम्हाला कोणताही क्युआर कोड स्कॅन करावा लागणार नाही, तसेच कोणताही मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागणार नाही. पीओएस मशिनवर मोबाईल टॅप केल्यास तुमचा व्यवहार पूर्ण होईल. टॅप केल्यानंतर वापरकर्त्याला त्याचा युपीआय पिन टाकावा लागेल, त्यानंतर व्यवहार पूर्ण होईल.
  • हे फिचर कार्यान्वित करण्यासाठी वापरकर्त्याला त्याच्या स्मार्टफोनला एनएफसी तंत्रज्ञान सक्षम करावे लागेल. सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही हे कार्यान्वित करून घेऊ शकता.
  • हे फिचर सध्या फक्त पाइन लॅब टर्मिनलवर उपलब्ध आहे. देशभरातील सर्व पाइन लॅब अँड्रॉइड पीओएसवर हे फिचर वापरता येणार आहे.