संजय राऊत यांची मुख्य नेते पदावरून हकालपट्टी; गजानन कीर्तिकर यांची वर्णी

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संजय राऊत यांची राज्यसभेतील मुख्य नेते पदावरून हकालपट्टी झाली. तर त्या पदावर गजानन कीर्तिकर यांची वर्णी लागली आहे.

संजय राऊत यांची मुख्य नेते पदावरून हकालपट्टी; गजानन कीर्तिकर यांची वर्णी

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालयानंतर मोठया हालचाली सुरु झाल्या होत्या शिवसेना नेत्यांची महत्त्वाची पदं संपुष्टात येणार अशी भीती व्यक्त केली जात होती. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांची राज्यसभेतील मुख्य नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,शिवसेना संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी यासंदर्भातील एक पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलं होतं. १७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळेल, असा निर्णय दिला. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली.

बैठकीत गजानन कीर्तिकर यांच्या नियुक्तीचा निर्णय झाला. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संजय राऊत यांची राज्यसभेतील मुख्य नेते पदावरून हकालपट्टी झाली. तर त्या पदावर गजानन कीर्तिकर यांची वर्णी लागली आहे. शिवसेना खासदारांनी संसदेतल्या शिवसेना कार्यालयात गजानन कीर्तिकर यांचा सत्कार केला. यावेळी खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, बुलढाण्याचे प्रतापराव जाधव, कोल्हापूरचे संजय मंडलिक, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे उपस्थित होते.