पाकिस्तानात 10 दहशतवादी ठार

पाकिस्तानात 10 दहशतवादी ठार


क्वेटा - पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका संघर्षात 10 दहशतवादी व दोन सैनिक ठार झाले आहेत. मागील काही दिवसांत अफगाण सीमावर्ती भागाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. लष्करी अधिकार्‍यांनुसार, दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर चकमक झडली. यात नऊ दहशतवादी ठार झाले.

यात आधुनिक रायफल्स, स्फोटके, हातबॉम्ब आणि रॉकेट आदी शस्त्रांचा वापर करण्यात आला. आतापर्यंत या घटनेची जबाबदारी कोणत्याही संघटनेकडून स्वीकारण्यात आली नाही. बलुचिस्तान प्रांताच्या आग्नेय भागातील अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्या उत्तर वझिरिस्तान या आदिवासी जिल्ह्यातील मिराण शाह शहरात लष्करावर केलेल्या हल्ल्यात दोन सैनिक आणि एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला. यावेळी काही शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केल्याचे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.