अयोध्येतील राम मंदिरात बसविला पहिला सोन्याचा दरवाजा

अयोध्येतील राम मंदिरात बसविला पहिला सोन्याचा दरवाजा

अयोध्या , (प्रबोधन न्यूज )  -  अयोध्येतील राम मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यावर आले. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिरातील पहिल्या सोन्याच्या दरवाजाचा फोटो समोर आला आहे.

या सोन्याच्या दरवाजावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा दरवाजा १२ फूट उंच आणि ८ फूट रुंद आहे. हा दरवाजा नुकताच पहिल्या मजल्यावर बसवण्यात आला आहे.

राम मंदिरात एकूण ४६ दरवाजे बसवण्यात येणार आहेत. यातील ४२ दरवाजे एकूण १०० किलो सोन्याने मढवले जाणार आहेत. मंदिराच्या पाय-यांजवळील चार दरवाजे सोन्याने मढवले जाणार नाहीत. येत्या काही दिवसांत आणखी १३ सोन्याचे दरवाजे बसवले जातील. राम मंदिराच्या गोल्डन गेटच्या फोटोंमध्ये मध्यभागी दोन हत्तींचे चित्र कोरण्यात आले आहेत.

दरवाजाच्या वरच्या भागात राजवाड्यासारखा आकार तयार करण्यात आला आहे. दरवाजाच्या तळाशी चौकोनी आकारात सुंदर कलाकृती आहे. हे दरवाजे तयार करण्यासाठी हैदराबादच्या एका कंपनीला निविदा देण्यात आली होती. कंपनीने महाराष्ट्रातील गडचिरोलीच्या जंगलातून लाकूड निवडले होते.