पुढील मुख्यमंत्री अजित पवारच – निलेश लंके

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुढील मुख्यमंत्री अजित पवारच – निलेश लंके

मुंबई (प्रबोधन न्यूज) - राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन लंके यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी गुरुवारी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात यासंदर्भात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुका सोबतच लढण्याच्या आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल, तर ते संपूर्ण महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरू शकतील.अजित पवारांना फक्त पाच वर्षं मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर आपलं राज्य २५ वर्षं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आहे, असेही लंके म्हणाले.

आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचे . फक्त व्यासपीठावर बोलण्यापेक्षा दादांची काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचवण्याचे काम येत्या वर्षभरात करायचं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यामुळे राज्यातला विकासाचा थांबलेला गाडा घराघरांत पोहोचवणं गरजेचे असल्याचेही लंके म्हणाले.

आगामी काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही दोन नावं मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार मानली जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागलेले उद्धव ठाकरेयांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मिळणार का? यावर चर्चा सुरु आहे. त्यात तिन्ही पक्षांची चर्चा, जागावाटप आणि जबाबदारी वाटप कसं होणार? हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी गुरुवारी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात यासंदर्भात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.