गांधीवाद, आंबेडकरवाद, समाजवाद व कम्युनिस्ट या विचारधारा भाजपाच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का?

विरोधी पक्षाचे नेते एकमेकांच्या सोबत दिसत आहेत. कुणी कोणासोबत लंच करतंय, कुणी कुणासोबत चहा घेतंय. एकत्र जेवण करणं आणि चहा पिणं ही भाजपाला हरवण्याची पद्धत नाही.”

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गांधीवाद, आंबेडकरवाद, समाजवाद व कम्युनिस्ट या विचारधारा भाजपाच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का?

पाटणा (बिहार) – पीके म्हणजेच प्रशांत किशोर यांनी NDTV ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर तुम्हाला भाजपाची ताकद, त्यांची बलस्थानं काय आहेत? याचाच अर्थ हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि कल्याणवाद काय आहे तो समजायला हवा. भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर कुठल्याही विरोधकाला या तीन गोष्टी विचारात घेऊन त्यांना आव्हान द्यावं लागेल.

ते पुढे म्हणाले की, गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी आणि कम्युनिस्ट या विचारधारा महत्त्वाच्या आहेत. मात्र या विचारधारांच्या नावे तुम्ही अंधविश्वास ठेवू शकत नाही. त्या विचारधारा भाजपाच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का? याचा विचार करावा लागेल.

प्रशांत किशोर म्हणाले, “मी सध्या पाहतोय विरोधी पक्षाचे नेते एकमेकांच्या सोबत दिसत आहेत. कुणी कोणासोबत लंच करतंय, कुणी कुणासोबत चहा घेतंय. मला विचारधारांची युती झालेली बघायला आवडेल. कारण एकत्र जेवण करणं आणि चहा पिणं ही भाजपाला हरवण्याची पद्धत नाही.”

“राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा काढली ती फक्त चालण्याशी संबंधित नव्हती. मागच्या सहा महिन्यांत राहुल गांधीवर टीकाही झाली आणि त्यांची स्तुतीही करण्यात आली. तुम्ही जेव्हा सहा महिने चालता, भारत जोडोसारखी यात्रा काढता त्यावेळी तुम्हाला पक्षामध्ये काही बदल झालेले दिसले पाहिजे. ही यात्रा काँग्रेसचं भवितव्य ठरवणारी आहे. माझ्यासाठी यात्रा म्हणजे मिशन नाही तर ज्या भागात ती जाते तो भाग समजून घेण्याचा प्रयत्न आहे.” असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळेही फारसा काही फायदा निवडणुकीच्या दृष्टीने होईल असं वाटत नाही असंही परखड मत प्रशांत किशोर यांनी मांडलं आहे. विरोधी पक्षांची एकजूट हा फक्त एक देखावा आहे. फक्त नेते एकत्र आल्याने भाजपाला हारवणं शक्य नाही असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.