केबीसीच्या हजाराव्या एपिसोडमध्ये शोचे होस्ट होण्याचे कारण सांगताना बीग बींना अश्रू अनावर !

केबीसीच्या हजाराव्या एपिसोडमध्ये शोचे होस्ट होण्याचे कारण सांगताना बीग बींना अश्रू अनावर !

मुंबई - 

टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध क्विझ रिऍलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चा शेवटचा भाग खूप खास होता. शुक्रवारी प्रसारित झालेल्या स्पेशल एपिसोडमध्ये अनेक खास क्षण पाहायला मिळाले. वास्तविक, या गौरवशाली शुक्रवारी केबीसीचे 1000 भाग पूर्ण झाले. या खास प्रसंगी, अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता आणि नात नव्या नवेली नंदा यावेळी शोमध्ये पाहुण्या म्हणून दिसल्या. इतकेच नाही तर बिग बींच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन देखील या खास प्रसंगी ऑनलाइन शोचा भाग बनल्या.

काल प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये, अमिताभ बच्चन यांनी केवळ त्यांच्या कुटुंबासोबत खेळ खेळला नाही तर अनेक मनोरंजक किस्सेही सांगितले. या एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांनाही फटकारले. त्याचवेळी, शोच्या या कामगिरीवर अनेक वर्षांपासून शोमध्ये होस्टच्या भूमिकेत दिसणारे अमिताभ बच्चन देखील भावूक झाले.

यादरम्यान शोचा 21 वर्षांचा प्रवासही एका व्हिडिओद्वारे प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आला. जवळपास दोन दशकांपासून सुरू असलेल्या या शोने यशाचे अनेक नवे कीर्तिमान रचले आहेत. शोमधील 21 वर्षांचा प्रवास पाहून अमिताभ भावूक झाले. त्याचवेळी व्हिडिओ पाहून जया बच्चन म्हणाल्या की, तुम्ही लोक हा शो थांबवू नका. थोडे कमी करा पण सतत करा. येथे भावूक झालेले बिग बी डोळ्यातील अश्रू पुसताना दिसले.

दरम्यान अमिताभ यांनी शोचे होस्ट होण्यामागे एक आश्चर्यकारक कारण सांगितले. ते म्हणाले की, जेव्हा मी चित्रपटांमधून टीव्हीवर येत होतो, तेव्हा लोकांनी मला तसे करण्यास मनाई केली होती. यामुळे माझी प्रतिमा खराब होईल, असे ते म्हणाले. पण, माझ्या काही मजबुरी होत्या. त्यावेळी मला चित्रपटात काम मिळत नव्हते. त्यामुळे मला टीव्हीकडे वळावे लागले.

यासाठी अमिताभ लंडनला गेले आणि तेथे सुरू असलेला शो पाहिल्याचे अमिताभ यांनी सांगितले. यानंतर त्यांनी  चॅनलवाल्यांना सांगितले की, जर तुम्हीही असे वातावरण तयार करू शकत असाल तर मी शो सुरू कारेन. त्यानंतर पहिल्या एपिसोडला मिळालेल्या प्रतिसादाने या शोला एक नवा मार्ग दाखवला. शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाकडून काहीतरी नवीन शिकायला मिळाले, असे अमिताभ म्हणाले.

शुक्रवारी शोचा एक भाग बनलेल्या अभिनेत्याची नात नव्याने सांगितले की ती आरती नायकसाठी हा गेम खेळणार आहे आणि तिथून बक्षिसाची रक्कम तिच्या एनजीओ सखी फाउंडेशनला देईल. सोनाली नायक गरीब मुलींना मोफत शिकवते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या पुढाकारातून ती एक हजाराहून अधिक मुलींना मोफत शिक्षण देत आहे.