'हा कोविड आता सगळ्यांना मारेल' म्हणत बायको आणि मुलांची हातोड्याने हत्या !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'हा कोविड आता सगळ्यांना मारेल' म्हणत बायको आणि मुलांची हातोड्याने हत्या !

कानपूर -  

वर्षभरापासून नैराश्यात असणाऱ्या कानपुरातील एका डॉक्टरने नवीन ओमिक्रोन विषाणूच्या धसक्याने आपल्या पत्नी व मुलांवर हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केली. त्यांच्या फ्लॅटमधून जप्त करण्यात आलेल्या डायरीत अनेक पानांच्या चिट्ठीत  'कोविड संबंधित नैराश्य...फोबिया. यापुढे कोविड नाही. हा कोविड आता सर्वांना मारेल. आता मृतदेह मोजू नका..ओमिक्रोन.' अशाच गोष्टी लिहिलेल्या आढळल्या.  पोलिसांनी ही नोट जप्त केली आहे. डॉ. सुशील कुमार असे या व्यक्तीचे नाव असून पत्नी चंद्रप्रभा यांचे डोके हातोड्याने फोडून तर शिखर आणि खुशी या दोन मुलांचा गळा आवळून खून करण्यात आला. 

डॉ. सुशील यांच्या पत्नी चंद्रप्रभा या शिवराजपूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. शिखर दिल्लीच्या सीएडी संस्थेतून अभियांत्रिकीची तयारी करत होता. मुलगी ख़ुशी वुडबाईन स्कूलमधून हायस्कूलचे शिक्षण घेत होती. तीन खून करून डॉ. सुशील फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चिठ्ठीत लिहिलेल्या प्रकारावरून ते तिघांचीही हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली. 
डॉक्टर सुशील खूप डिप्रेशनमध्ये असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कोविड आजारामुळे तो इतका तणावाखाली होता की त्याला वाटले की आता एकही जीव उरणार नाही. त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले. डॉ. सुशील यांनी या चिठ्ठीत पुढे लिहिले, 'मी माझ्या कुटुंबाला संकटात सोडू शकत नाही. मी सर्वांना मुक्तीच्या मार्गावर सोडत आहे. मी एका क्षणात सर्व संकटे दूर करत आहे. माझा आत्मा मला कधीच माफ करणार नाही. बाय...'