घोसाळकर हत्या प्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

घोसाळकर हत्या प्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई , (प्रबोधन न्यूज )  -  ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरूवारी मुंबईमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकर यांची ५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, या घटनेने मुंबईसह राज्यात खळबळ उडाली.

स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणारा मॉरिस नोरोन्हा याने घोसाळकर यांची हत्या केली, त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून त्यानेही आपले जीवन संपवले. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच १ पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसेही जप्त केले आहेत.

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसचा पीए मेहूल पारिख आणि रोहित साहू या दोघांना ताब्यात घेतले आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार होण्यापूर्वी मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात झालेल्या संभाषणामधून मेहूल पारिख याच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला होता. आता ताब्यात घेतलेल्यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. या दोघांकडून काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.