ताम्हिणी घाट, देवकुंड धबधबा, आणि सिक्रेट पॉइंट पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी; वीकेंडला मान्सून सहलीचा बेत फसला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, (प्रबोधन न्यूज ) - पावसाळा हा अनेकांच्याच आवडीचा ऋतू. कारण, या ऋतूमध्ये निसर्ग विविध ठिकाणांवर मुक्त हस्तानं उधळण केल्यामुळं त्यांचं सौंदर्य आणखीन खुलून आलेलं असतं. हा तोच ऋतू आहे ज्यामध्ये आपल्याला पावसाचा मनसोक्त आनंद घेता येतो. बेभान होऊन हिंडताही येतं. धबधब्यांच्या प्रवाहांना डोळे भरून पाहता येतं, तर खळाळणाऱ्या जलस्त्रोतांच्या किनारी बसून त्या थंडगार पाण्यात पाय भिजवत निवांत क्षणांचा आनंद लुटता येतो.
Monsoon म्हटलं की, त्याच्या आगमनापूर्वीच अनेक मंडळी मान्सून सहलींचे बेत आखू लागतात. सुट्ट्यांची आणि मित्रमंडळींची जमवाजमन करत मग एखाद्या सुरेख अशा ठिकाणाची निवड केली जाते आणि मग प्रतीक्षा सुरु होते ती म्हणजे तो दिवस उजाडण्याची. बरं, वीकेंडला घरात न बसता पावसाचा आनंद लुटण्यासाठी कुठंतरी छानशा ठिकाणी जाणारेही यात आलेच. पण, आता मात्र या सर्वांचाच हिरमोड होणार आहे.
आठवडी सुट्ट्यांच्या दिवशी म्हणजेच वीकेंडच्या दिवशी तुम्हीही कुठे जाण्याचा बेत आखताय का? आधी ही बातमी वाचा, कारण तुम्हाला हा बेत रद्द करावा लागू शकतो किंवा त्यात मोठे बदल करावे लागू शकतात. कारण ठरतोय एक शासन निर्णय.
पावसाळी सहलींसाठी तुम्हीही रागयगमधील कोणत्या ठिकाणी जाणार असालस, तर ही माहिती वाचा आणि इतरांनाही सांगा कारण, रायगडच्या माणगाव मधील पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. अनेकांचीच पसंती असणाऱ्या ताम्हिणी घाट, देवकुंड धबधबा, आणि सिक्रेट पॉइंट या ठिकाणी पर्यटकांना जाता येणार नाहीये.