“मा. टी.पी.ओ. अप्टीट्यूड आयडॉल – 2023” स्पर्धेचे मा. टी.पी ओ. व डीटीई तर्फे आयोजन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
ऑनलाइन स्पर्धेसाठी राज्यभरातून 30,000 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
पिंपरी - महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (MaTPO) व महाराष्ट्र शासनाचे तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) यांच्या संयुक्त विद्यमाने मा. टी.पी.ओ. अप्टीट्यूड आयडॉल - 2023 या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची रोजगार मिळविण्यासाठीची तयारी करून घेणे व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्लेसमेंट मिळवण्यासाठी उद्युक्त करणे हा या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे महाराष्ट्र टी.पी.ओ. असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे व डीटीईचे संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी कळविले आहे.
सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नसून B.E. / B.Tech. / M.E. / M.Tech. / Diploma / BCA / MCA / BCS / MCS / BBA / MBA / B.Sc. / M.Sc. / B.Pharm. / M.Pharm. / Other Courses बी.ई. / बी.टेक / एम.ई. / एम.टेक. / डिप्लोमा / बीसीए / एमसीए / बीसीएस / एमसीएस / बीबीए / एमबीए / बी.एससी. / एम.एससी. / बी.फार्म. / एम.फार्म. व इतर कोर्सेसचे प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष यातील सर्व विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांनी खालील लिंक वरती ऑनलाईन नाव नोंदणी करावी.
नाव नोंदणी लिंक:
https://tinyurl.com/MaTPO-Aptitude-Idol-2023
विजेत्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाईल, टॅब, स्मार्टवॉच, बॅग यासारखी पारितोषिके दिली जाणार आहेत.
PHN Technology, Ebek Language Laboratories, Aon Cocubes, Global Dreamz, Campus Credential, iSchoolConnect Technologies, Kolhapur Foundry and Engineering Cluster व ISHRAE Pune Chapter पी.एच.एन. टेक्नॉलॉजी, ईबेक लँग्वेज लॅबोरेटरीज, एऑन-कोक्युबस्, ग्लोबल ड्रीम्झ, कँपस क्रिडेंशीअल, आय स्कूल कनेक्ट टेक्नॉलॉजीज, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनीअरिंग क्लस्टर व इशरे-पुणे चॅप्टर हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत.
सदर स्पर्धेच्या आयोजनाकरिता महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स, प्राचार्य व प्राध्यापकांचे सहकार्य मिळाले असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मा.टी.पी.ओ. व डीटीई तर्फे करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी मा टी.पी.ओ. चे सेक्रेटरी डॉ. संजय जाधव, प्रा. संजय धायगुडे, प्रा. सुदर्शन सुतार, प्रा. दीपक पवार, प्रा. अमेय गौरवाडकर, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. विजय टोपे यांचे सहकार्य लाभले आहे.