राम नवमी सोहळा सुरु असताना मंदिराच्या विहिरीत 25 जण बुडाले
इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. मंदिरातील विहीर पटेल नगर येथील झुलेलाल मंदिराच्या पायरीवरील छत कोसळल्याने अनेकजण आतमध्ये पडले आहेत. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
इंदूर (मध्यप्रदेश) - इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. शहरातील पटेल नगरात असलेल्या बेलेश्वर मंदिरातील बावडी (विहिरी) चे छत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारांबळ उडाली आहे. विहिरीची खोली ५० फुटांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात २५ जण पडल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. 10 जणांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
रामनवमीला बेलेश्वर मंदिरात हवन सुरु होता. यासाठी लोकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शविली होती. या मंदिरात एक जुनी आणि 10 वर्षांपूर्वी छत टाकून मुजवलेली विहीर होती, पूजेच्या वेळी 20-25 लोक विहिरीच्या छतावर उभे होते, तेव्हा अतिवजनानं अचानक हे छत खाली कोसळलं. त्यात सुमारे 20-25 जण विहिरीत पडले. ही विहीर 50 फूट खोल असल्याचे सांगण्यात येत आहे. इंदूर जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. मात्र, विहिरीत पाणी असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. लोकांना मंदिराजवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे. बाहेर काढण्यात आलेल्या 10 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. अग्निशमन दलाचे काही जवान खाली उतरले. दोरीच्या साहाय्याने आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाविकांना सुखरूप बाहेर काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
शिवराज सिंह चौहान यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, देवाच्या कृपेने आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने बचाव कार्यात व्यस्त आहोत. मी संपर्कात आहे आतापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. काही लोक अजूनही आत आहेत पण सुरक्षित आहेत. प्रभू रामाच्या कृपेने आम्ही उत्तम आणि उत्तम संसाधने गोळा करत आहोत. मला आशा आहे की प्रत्येकजण सुरक्षितपणे बाहेर पडेल. अद्याप कोणतीही दुर्दैवी बातमी नाही.