राहुल गांधींवरील कारवाई विरोधकांच्या पथ्यावर
एरवी काँग्रेसला विरोध करणारे पक्षही या मुद्द्यावरून काँग्रेसच्या बाजूने उभे राहत असल्याचे चित्र या घटनेने निर्माण झाले आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेली शिक्षा आणि त्यानंतर तातडीने केलेले निलंबन या वरती या बैठकीत चर्चा करण्यात आली. संपूर्ण देशात लोकशाहीची मुस्कटदाबी होत असून, विरोधी पक्षांनी एकत्रितपणे त्याला विरोध केला पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले.
मोदी आडनावावरून राहुल गांधी यांच्या विरोधात सुरत येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्यात राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर तातडीने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. या वेळी या शिक्षेचे कायदेशीर परिणाम ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार या विरोधात अपिल दाखल केल्यानंतर सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश आपोआप रद्द होईल. दरम्यान, एरवी काँग्रेसला विरोध करणारे पक्षही या मुद्द्यावरून काँग्रेसच्या बाजूने उभे राहत असल्याचे चित्र या घटनेने निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी हे भाजपचा टीआरपी वाढवणारे नेते आहेत, अशी टीका करणाऱ्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावर राहुल यांना पाठिंबा दिला. देशात लोकशाहीचे आकुंचन होत असून, त्या विरोधात सामान्य भारतीयांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना दिला.
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयाला विरोध केला. राहुल गांधी यांच्याशी व्यक्तीगत मतभेद असले तरी, अशा पध्दतीने राजकीय सूड उगवणे योग्य नसल्याची भावना केजरीवाल यांनी व्यक्त केली.
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वळचणीला गेले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर जी-२३ या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने संशय व्यक्त केला होता. मात्र राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर या गटाचा विरोध मावळल्याचे चित्र निर्माण झाले होते.
राहुल गांधी यांना झालेली शिक्षा खूप मोठी आहे असे मत कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनीही या मुद्द्यावर केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. हे दोन्ही नेते जी-२३ गटाचे महत्वाचे नेते आहेत. त्यामुळेच विरोधकांच्या एकत्रीकरणाला सरकारच्या कारवाईने आणि न्यायालयाच्या निर्णयाने चालना मिळाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या कथित संबंधावरून राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच या संबंधांची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. या दोन्ही गोष्टींवरून विरोधकांच्या हाती सरकारच्या विरोधात उभे राहण्यासाठी एक आयताच मुद्दा मिळाला आहे. विरोधक आक्रमक होऊन सरकारच्या या निर्णयाला विरोध करीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय पटलावर महत्वाच्या घडामोडी होऊ शकतात, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.