सावरकर वादावरून शरद पवारांनी केली राहुल गांधींची कानउघाडणी

शरद पवार म्हणाले, “सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकर माफीवीर म्हणणं योग्य नाही.”

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सावरकर वादावरून शरद पवारांनी केली राहुल गांधींची कानउघाडणी

नवी दिल्ली - सावरकर मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापू लागलं आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून एकीकडे उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना भाजप-शिवसेनेने राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणाही केली. दरम्यान, याच मुद्द्यावर दिल्लीत झालेल्या बैठकीत शरद पवारांनी भाष्य केले आहे. दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सावरकरांबद्दल सुरू असलेल्या वादावर भूमिका मांडली. शरद पवार म्हणाले, “सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकर माफीवीर म्हणणं योग्य नाही.” या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते.

बैठकीत सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करूयात, असे आवाहनही शरद पवारांनी केले. शरद पवारांच्या या मताला मित्र पक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा मी आदर करतो, असे म्हटले आहे.

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीरांचा अवमान केल्याचा आरोप भाजप-शिवसेना करत आहे. महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव सेनेलाही याच मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेने घेरले आहे. त्यामुळे ‘हिंदुत्ववादी’ प्रतिमेला तडा गेलेल्या उद्धव ठाकरेंनी रविवारी ‘सावरकरांचा अवमान सहन करणार नाही’ असा इशारा मालेगावच्या सभेतून राहुल यांना दिला. इतकेच नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंतर्फे आयोजित डिनरवर उद्धव सेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली.

काँग्रेसने सोमवारी सायंकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी डिनर आयोजित केले होते. डिनरमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट), तृणमूल काँग्रेसचे नेते नव्हते. बैठकीला 18 पक्षांची उपस्थिती होती. यात राष्ट्रवादी, आप, जेएमएम, डीएमके, जेडीयू, बीआरएस, आरजेडी, सीपीआई, सीपीएम, आरएसपी, नेशनल कॉन्फ्रेंस, आईयूएमएल, एमडीएमके इत्यादीचे नेते सहभागी झाले होते. उद्धवसेना सावरकर मुद्यावरून नाराज असल्याने या बैठकीत त्यांचे खासदार सहभागी झाले नाही.

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत उद्धव यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. इतकेच नव्हे तर सावरकर यांचा त्याग व देशभक्तीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राज्याच्या गावागावात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याची घोषणाही केली. 2004 मध्ये सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला बाळासाहेब ठाकरेंनी जोडे मारो आंदोलन केले होते, त्याचा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत दाखवला. उद्धव ठाकरेही याप्रमाणे राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणार का?, असे आव्हान एकनाथ शिंदेंनी दिले होते.