भाजपचा आमदार विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहताना पकडला गेला

भाजपचा एक आमदार विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहत असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपचा आमदार विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहताना पकडला गेला

त्रिपुरा, दि. ३० मार्च -  भाजपचा एक आमदार भर विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहत असताना पकडला गेला आहे. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं भाजपची कोंडी झाली आहे. त्रिपुरा विधानसभेचं अधिवेशन सध्या सुरू आहे. हे अधिवेशन सुरू असताना सभागृहात खुर्चीवर बसून आमदार जादब लाल नात हे मोबाईलवर पॉर्न पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ आजचा (३० मार्च) आहे. अश्लील व्हिडिओ पाहणारे जादब लाल नाथ हे बागबासा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. जादब लाल नाथ आपल्या सीटवर बसून मोबाइलवर व्हिडिओ पाहत असल्याचं व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.

विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना ही घटना घडल्याचे वृत्त आहे. सभापती व अन्य आमदार बोलत होते. हा व्हिडिओ नाथच्या मागे बसलेल्या कोणीतरी टिपला आहे, या व्हिडिओ क्लिपमध्ये नाथ आपल्या बोटाने फोनची स्क्रीन स्क्रोल करत असल्याचे दिसत आहे.

भाजपने आमदाराकडून स्पष्टीकरण मागितले असून त्यांना समन्स बजावल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. नाथ यांनी अद्याप आरोप किंवा व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली नाही. अधिवेशन संपताच ते विधानसभेच्या आवारातून निघून गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०१८ च्या निवडणुकीत सीपीएमच्या बिजीता नाथ यांनी भाजपच्या प्रदीप कुमार नाथ यांचा २७० मतांनी पराभव केला. यावेळच्या निवडणुकीत भाजपनं जादब लाल नाथ यांच्यावर विश्वास दाखवला होता. तो त्यांनी सार्थ ठरवला. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बिजीता नाथ यांचा विजयरथ रोखला. त्यांनी बिजीता नाथ यांचा १४०० मतांनी पराभव केला. तृणमूल काँग्रेसचे बिमल नाथ तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते, तर टिपरा मोथाच्या कल्पना सिन्हा चौथ्या स्थानावर राहिल्या. या विजयामुळं पक्षात त्यांचं वजन कमालीचं वाढलं होतं. मात्र, आजच्या घटनेमुळं त्यांच्यासह भाजपचीही कोंडी झाली आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत त्रिपुरा हे राज्य डाव्या पक्षांचा बालेकिल्ला मानला जात असे. अनेक वर्षे तिथं डाव्यांची सत्ता होती. देशातील मोदी लाटेत २०१८ साली भाजपची सत्ता आली होती. मात्र, डाव्यांचा गड असलेला बागबासा हा मतदारसंघ भाजपला तेव्हा जिंकता आला नव्हता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जादब लाल नाथ यांनी ही कामगिरी फत्ते केली.

ही अशी काही वेगळी घटना नाही. यापूर्वीही सार्वजनिक ठिकाणी पॉर्न पाहताना आमदारांना पेच सहन करावा लागला आहे. 2012 मध्ये, कर्नाटकमधील भाजप सरकारमधील दोन मंत्री विधानसभेच्या कामकाजादरम्यान मोबाईल फोनवर अश्लील क्लिप पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. माहिती गोळा करण्यासाठी आणि रेव्ह पार्ट्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ पाहत असल्याचे त्याने नंतर स्पष्ट केले.