मजुराच्या बँक खात्यावर चुकून पैसे जमा झाले, मोदींनी पैसे दिल्याचा समज
बीडी कामगाराच्या बँक खात्यावर चुकून दुसऱ्याच एका महिलेचे पैसे जमा झाले. कामगाराला वाटले पंतप्रधान योजनेतून पैसे मिळाले. आता पर्यंत १ लाख रुपये खर्च करून बसला.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
झारखंड, दि. २९ मार्च - झारखंडमध्ये एका विडी कामगाराचा आधार क्रमांक एका महिलेच्या बँक खात्याशी चुकून लिंक झाला. मजूर त्या खात्यातून पैसे काढून खर्च करत राहिला. दोन वर्षांसाठी त्यांनी खात्यातून एक लाखाहून अधिक रक्कम काढली. हा प्रकार महिलेच्या लक्षात येताच तिने बँक मॅनेजरकडे तक्रार केली.
तपासाअंती ४२ वर्षीय बिडी कामगार जितरे सामंत याला २४ मार्च रोजी अटक करण्यात आली. पैसे का काढले असे विचारले असता तो म्हणाला, "मला वाटले पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या खात्यात पैसे पाठवत आहेत. आता पैसे परत करू शकत नाही. आम्ही तेवढे सक्षम नाही."
ही घटना झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जीताताई सामंत यांचे आधार दुसऱ्या महिलेच्या खात्याशी लिंक झाले. जितरे कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये गेले तेव्हा त्यांना कळले की, त्यांचे आधारशी लिंक केलेले खाते आहे, ज्यामध्ये पैसे आहेत. सामंत यांनी पैसे काढणे सुरूच ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक कर्मचारीही मजुराला पैसे काढण्यासाठी मदत करत होता.
ज्या महिलेचे खाते सामंत यांच्या आधारशी लिंक करण्यात आले होते. तिचे नाव लगुरी. त्यांच्या खात्यातून हळूहळू पैसे गायब होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झारखंड राज्य ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली.
व्यवस्थापकाने अधिकाऱ्यांना पत्र लिहून चूक लक्षात आल्यावर सामंत यांच्याकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. सामंत पैसे देऊ शकले नाहीत. त्याच्याविरुद्ध ऑक्टोबरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता.
बिडी कामगार जितरे यांनीही बँकेचे अधिकारी आपला मानसिक छळ करत असल्याचा अर्ज एसपींना दिला होता. मजुराने सांगितले की, सप्टेंबर महिन्यात बँकेने माझे आधार चुकीच्या खात्याशी लिंक केल्याची माहिती दिली. बिडी कामगार जितरे यांनीही बँकेचे अधिकारी आपला मानसिक छळ करत असल्याचा अर्ज एसपींना दिला होता. मजुराने सांगितले की, सप्टेंबर महिन्यात बँकेने माझे आधार चुकीच्या खात्याशी लिंक केल्याची माहिती दिली.
सामंत यांनी एसपींना दिलेल्या अर्जात लिहिले की, कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान बँक खात्यात पैसे जमा करत असल्याची चर्चा परिसरात होती. मीही माझ्या खात्याची चौकशी करण्यासाठी गेलो असता त्यात एक लाख रुपये असल्याचे समजले. गरजेनुसार, मी ते पैसे 2-4 महिन्यांत काढून घेतले.