गेल्या ४ दिवसात ४८ लाख महिलांनी केला एसटीने प्रवास

कुणी देवस्थानाला जात आहे तर कुणी वास्तुशांतीसाठी जातेय. कुणी पर्यटनाला निघाले तर कोणी नातवाईकांच्या भेटीला. एसटीच्या प्रवासदरात महिलांना ५० टक्के सवलत झाल्यामुळे महिलांचे पर्यटन वाढले आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गेल्या ४ दिवसात ४८ लाख महिलांनी केला एसटीने प्रवास

मुंबई - राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसमधून प्रवास करताना महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. या महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली असून, मागील चार दिवसात ४८ लाख महिलांनी सवलतीत प्रवास केला आहे.

अर्थसंकल्पामध्ये महिला सन्मान योजनेची घोषणा करण्यात आली होती. यात सर्वच महिलांना बसमधून प्रवास करताना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, याची अंमलबजावणी लवकर होत नव्हती. त्यामुळे रेणापुरात महिला प्रवासी आणि वाहकाचा वादही झाला होता. समाजमाध्यमांवर याबाबत चर्चा होताच राज्य शासनाने महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू केली आहे.

राज्यभरातील अनेक बस स्थानकावर आणि बसमध्येही महिला प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुणी देवस्थानाला कोणी जात आहे तर कुणी वास्तुशांतीसाठी जातेय. कुणी पर्यटनाला निघाले तर कोणी नातवाईकांच्या भेटीला. सर्वच बसस्थानकावर महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. साधी बस असो की शिवशाही या गाडीमध्ये अर्धे तिकीट आकारले जात असल्यामुळे महिला प्रवाशाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

महामंडळाकडून आतपर्यंत 39सवलती दिल्या जात होत्या. ज्यात आता 75 वर्षावरील नागरिकांना मोफत आणि आता महिलांना 50 % तिकीट सवलत दिली जात आहे. याचा मोठा आर्थिक भार हा महामंडळावर पडतोय. राज्य सरकारने प्रवासात विविध सवलत दिली पण याचा भार एसटी महामंडळावर पडतोय. आधीच आर्थिक अडचणीत असलेले एसटी महामंडळ आणखी अडचणीत जाणार की काय? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.