लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठ्या माशांना धडा शिकवावा - अजित गव्हाणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये एक लाख रुपयांची लाच घेताना टेंडर क्लार्कला रंगेहाथ पकडले.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठ्या माशांना धडा शिकवावा - अजित गव्हाणे

पिंपरी - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाणीपुरवठा विभागातील लिपिकाला लाखोंची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. हे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे केवळ हिमनगाचे टोक असून, हा भ्रष्टाचार करण्यास पाडणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांसह त्यांना राजकीय पाठबळ देणाऱ्या बड्या माशांना पकडावे. महापालिकेत निर्माण झालेल्या भ्रष्ट्र कारभाराला केवळ भाजपची सत्ता आणि त्यांचे नेतृत्त्व जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये एक लाख रुपयांची लाच घेताना या विभागातील टेंडर क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. या घटनेनंतर अजित गव्हाणे यांनी पत्रक काढून महापालिकेतील भ्रष्टाचारावर आणि भाजपच्या कारभारावर प्रहार केला आहे.

अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपच्या काळात खंडणीखोरी, लाचखोरी आणि भ्रष्टाचार मुळापर्यंत रुजला आहे. गेल्या पाच वर्षांत ज्या पद्धतीने भ्रष्ट कारभार झाला त्याच पद्धतीने प्रशासकीय राजवटीतही कारभार सुरू आहे. राज्यात भाजपची सत्ता असल्याने प्रशासकावर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा अंकुश आहे. यातूनच आपल्याला हवी तशी कामे करून घेण्यासाठी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे.

पाणीपुरवठा विभागात आज जी कारवाई झाली ती केवळ हिमनगाचे टोक आहे. प्रत्येक निविदा ही रिंग करून भरण्यात येत आहे. शेकडो कोटींच्या निविदा फुगविण्यात आल्या असून, निश्चित दरापेक्षा अधिक रक्कमेने काम दिले जात आहे. जे ठेकेदार प्रामाणिकपणे काम करू पाहतात त्यांना दमबाजी करून बाजूला केले जात आहे. त्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्रास निविदा ही आपल्या हस्तकांना देण्याचा प्रकार भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाणीपुरवठा विभागातील कारवाईत सापडलेल्या लिपिकांसह अधिकाऱ्यांची कसून चौकशी केल्यास मोठे मासे गळाला लागतील. केवळ कारवाईचा फार्स न करता दोषी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांना राजकीय पाठबळ देणाऱ्या लोकांपर्यंतचे धागेदोरे शोधल्यास सत्य बाहेर येईल. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठ्या माशांपर्यंत आपल्या तपासाची सूत्रे नेल्यास महापालिकेतील भ्रष्टाचाराला अंकुश मिळेल, तसेच सत्यही बाहेर येईल, असेही या पत्रात गव्हाणे यांनी म्हटले आहे.

‘जॅकवेल’ निविदेत करोडोंचा भ्रष्टाचार भामा आसखेड धरणातून पाणी उपसा करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जॅकवेलच्या निविदेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. पाणीपुरवठा विभागाने अशाच पद्धतीने अनेक निविदांमध्ये भ्रष्टाचार, लाचखोरी केली असून, जॅकवेल निविदेचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही गव्हाणे यांनी केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने योग्य दिशेने तपास केल्यास जॅकवेल निविदेतील सत्यही बाहेर येऊ शकते. त्यामुळे या विभागाने स्वत:हून जॅकवेल प्रकरणाचीही चौकशी करावी, असेही गव्हाणे यांनी या पत्रकात म्हटले आहे.