अफलातून ! 'हे' अनोखे चष्मे लावून गायी जास्त दूध देतात, शेतकरी होत आहेत श्रीमंत, जाणून घ्या पूर्ण कहाणी !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अफलातून ! 'हे' अनोखे चष्मे लावून गायी जास्त दूध देतात, शेतकरी होत आहेत श्रीमंत, जाणून घ्या पूर्ण कहाणी !
नवी दिल्ली - 

गायी आणि म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांपासून जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळावे, ते बाजारात विकून मोठा नफा कमावता यावा, अशी इच्छा असतेच. यासाठी ते त्यांना उत्तम डोसही देतात. जास्त दूध देणाऱ्या जनावरांची किंमतही बाजारात सर्वाधिक आहे. खरेदीदार ही जनावरे चांगल्या दराने खरेदी करतात, परंतु जे गरीब आहेत आणि दुधाचा व्यापार करू इच्छितात त्यांना महागडी जनावरे खरेदी करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने असा काही भन्नाट जुगाड केला आहे की, गायी-म्हशी कमी साधनातही जास्त दूध देत आहेत. एका तुर्की शेतकऱ्याने आपल्या गायीपासून अधिक दूध मिळविण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. शेतकऱ्याने गाय हायटेक केली आहे. याचा फायदा शेतकऱ्याला झाला की आता त्याची गाय 5 लिटर जास्त दूध देऊ लागली आहे.

तुर्कीतील अक्सरे शहरातील रहिवासी शेतकरी इज्जत कोकाक यांनी त्यांच्या गायीला व्हर्च्युअल रिऍलिटी गॉगल लावले. आता गाईच्या डोळ्यासमोर मोकळ्या हिरवळीचे दृश्य दिसू लागले, त्यामुळे गायीला ती एका मोठ्या शेतात चरत असल्याचा भास झाला. मात्र प्रत्यक्षात तसे नसून शेतकरी त्यांना घराजवळील खुंटीला बांधून ठेवतो.

या तंत्राचा फायदा इतर शेतकऱ्यांना कळल्यावर त्यांनीही त्याचा अवलंब केला. एका अभ्यासातून असेही समोर आले आहे की, गाई आणि म्हशी जेव्हा हिरवेगार शेत पाहतात तेव्हा त्या सरासरीपेक्षा जास्त दूध देतात.
 
गायीच्या डोळ्यांवर व्हीआर गॉगल लावल्याने त्यांना खूप फायदा झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचे दूध उत्पादन वाढले आहे. या शेतकऱ्याने सांगितले की, पूर्वी गाय 22 लिटर दूध देत होती, आता ती 27 लिटर दूध देते. जनावरांना व्हीआर चष्म्यातून हिरवे शेत दिसते आणि ते पाहून त्यांना शेतात चरल्यासारखे वाटते आणि ते त्यांचे दूध आणखी वाढवतात.

आजूबाजूचे शेतकरीही आपल्या गाई-म्हशींवर असे प्रयोग करत असून त्यांना त्याचा भरपूर फायदा होत आहे. दुधाचे उत्पादन जास्त असल्याने त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.