'अजितदादा आमच्यासोबत आले, आता...', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांना 29 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे, पण अजितदादांसह 40 आमदार सोबत आल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घेऊन आले आहेत का आमदार घेऊन आले आहेत? असा प्रश्न विचारला असता बावनकुळे यांनी उत्तर देणं टाळलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्यामध्ये आज अजितदादा पवार आणि त्यांचे सहकारी आमदार यांनी आपल्या शिवसेना-भाजप युतीच्या डबल इंजिन सरकारला विकासासाठी साथ दिली आहे. अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विकासाच्या राजकारणाला विकासाच्या माणसाने साथ दिली आहे.
कतृत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जातं तेव्हा अशा घटना घडत असतात, हे आपण आधीही पाहिलं आहे. डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिन जोडलं आहे. राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचा फायदा मिळेल, राज्याचा विकास वेगाने होईल', असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.