उंदराने पळविले १० तोळे सोने; पोलिसांनी चिकाटीने शोध घेत परत मिळवून दिले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उंदराने पळविले १० तोळे सोने; पोलिसांनी चिकाटीने शोध घेत परत मिळवून दिले
उंदराने पळविले १० तोळे सोने; पोलिसांनी चिकाटीने शोध घेत परत मिळवून दिले

मुंबई, (प्रबोधन न्यूज) – ही आश्चर्यकारक घटना मुंबईतील गोकुळधाम सोसायटीजवळ घडली आहे. पोलीस उप निरीक्षक जी घारगे यांनी यांनी ही माहिती दिली आहे. सीसीटीव्हीमुळे हा प्रकार उघडकीस आला. काही उंदरांनी वडापावसोबत कचऱ्याची बॅगही गटारात नेली. त्यात दहा तोळे सोनं होतं.

दिंडोशी भागात राहणाऱ्या सुंदरी प्लानिबेल यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी १० लाख रूपये कर्ज घेतलं होतं. या कर्जासाठी तारण म्हणून सुंदरी प्लानिबेल सोन्याचे दागिने बँकेत ठेवणार होत्या. तीन दिवसांपूर्वी बँकेत जात असताना राम नगर या ठिकाणी चुकून वडा पावसोबत दागिन्यांची पिशवीही त्यांनी भिक्षेकरी महिलेला दिली.

त्यांना ही बाब त्या वेळी लक्षातही आली नाही की, आपण त्या भिक्षेकरी महिलेला वडापावसोबत सोन्याचीही पिशवी दिली आहे. हे जेव्हा कळले तेव्हा सुंदरी त्या ठिकाणी परत आल्या. परंतु ती भिकारी त्या ठिकाणी दिसली नाही. मग मात्र त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तातडीने पोलीस चौकीत धाव घेतली व घडलेली घटना पोलिसांच्या कानावर घातली. पोलिसांनीही त्वरेने हालचाल करून तपासास सुरुवात केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्या भिक्षेकरी महिलेला शोधलं. मात्र सोन्याची पिशवी तिच्याकडेही नव्हती. वडापाव सुकलेला होता त्यामुळे मी ती पिशवी कचरापेटीत टाकून दिली असं त्या महिलेने सांगितलं.

यानंतर दिंडोशी पोलिसांनी पुन्हा एकदा सीसीटीव्ही तपासलं. या भिक्षेकरी महिलेने ज्या ठिकाणी कचरा फेकला होता ती जागाही तपासली. सीसीटीव्हीतही ही महिला कचरा पेटीत पिशवी फेकून दिल्याचं दिसतं आहे. त्यानंतर ही पिशवी एक उंदिर घेऊन जात असल्याचंही पोलिसांना दिसलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कचरा कुंडीजवळ असलेल्या गटारातून सोन्याचे दागिने असलेली पिशवी बाहरे काढली आणि महिलेकडे दागिने सोपवले.

त्यामुळे महिलेचा जीव भांड्यात पडला. महिलेचे जे दागिने हरवले आणि परत मिळाले त्यात सोन्याच्या चेन, अंगठ्या आणि कानातल्यांचा समावेश आहे. या सगळ्याची किंमत पाच लाख रूपये आहे. हे सोनं तारण ठेवून महिला कर्ज घेणार होती. त्यासाठी बँकेत जात असतानाच ही घटना घडली.