राज ठाकरे रुग्णालयात दाखल; उद्या होणार पायावर शस्त्रक्रिया
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. 31 मे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (वय ५३) यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज ठाकरे यांच्यावर बुधवारी हिपची शस्त्रक्रिया होणार असून, त्यासाठी त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पक्षाच्या एका नेत्याने ही माहिती दिली. या महिन्याच्या सुरुवातीला मनसे प्रमुखांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले होते की, त्यांच्या गुडघ्याच्या आणि पाठीच्या त्रासावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
पुण्यात घेतलेल्या सभेत त्यांनी पायाचा कोणता आजार झाला आहे, हे सांगितले होते. त्यांनी सांगितले की कामानिमित्त पुण्यात येत असताना वाटेत त्यांचे पाय दुखू लागले प्रचंड वेदनेमुळे मुंबईला परतावे लागले आणि काही चाचणी केल्यावर डॉक्टरांनी हिपबोनची शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले. आता उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून त्यांना दोन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार. त्यांच्या विश्रांतीच्या काळात मनसेचे पदाधिकारी आणि नेते राज्यात विधानसभा स्तरावर जाहीर सभा आणि परिषदा घेतील, असे मनसे नेते बाळा नांदगावकरांनी सांगितले.