पर्यटकांसाठी खूष खबर ! आपले भूशी धरण ओव्हर फुल्ल !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) – आज (बुधवार, दि. ६ जुलै) सकाळी ७ वाजता भूशी धरण पूर्ण क्षमतेनं भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहायला सुरुवात झाली आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याची बातमी वाऱ्याप्रमाणे शहरात पसरल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी भुशी धरणावर वर्षाविहाराचा गर्दी केली होती. भुशी धरण हे लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. लाखो पर्यटक दरवर्षी याठिकाणी भेट देत वर्षाविहाराचा आनंद लुटतात.
राज्यात पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यात गेले 2-3 दिवस चांगला पाऊस झाला, त्यामुळे परिसरातील अनेक धरणांची पाणी पातळी वाढली. तर लोणावळा शहरातील पर्यटनाचं मुख्य आकर्षण असलेलं भुशी धरणसुद्धा ओव्हर फ्लो झालेलं पाहायला मिळालं. आकाराने लहान असलेले भुशी धरण दोनच दिवसांत ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच विविध भागातून धबधबे देखील वाहू लागले आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदी आदेशामुळे पर्यटकांना वर्षाविहाराचा आनंद घेता आलेला नाही. यंदा मात्र पर्यटकांना मनमुराद भूशी डॅमवर वर्षाविहाराचा आनंद घेता येणार आहे. लोणावळ्यातील या डॅमवर पुणे, मुंबईतील लाखो पर्यटक भेट देतात. जोरदार पावसाचा फटका मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूकीला बसला असून वाहतूक संथगतीने सुरू आहे. मात्र त्याचवेळी भुशी धरण भरल्याने पर्यटक पावसाचा आनंद लुटण्याबरोबर धरणाच्या सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने धरणाच्या पाणासाठ्यात वाढ झाली.
शनिवार, रविवार सलग सुटी असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भुशी धरणावर फेरफटका मारण्यासाठी येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये धरणाच्या पायर्यांवर बसून पावसात चिंब भिजण्याचा आनंद, तसेच फोटोची क्रेझ देखील पाहायला मिळते. धरणाच्या पाणीपातळीत झालेली वाढ स्थानिक विक्रेत्यांना सुखावणारी आहे. पावसाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.