मातृभाषेबरोबर इतर भाषेवर प्रभुत्व मिळवाल तरच यशस्वी व्हाल - व्याख्यात्या डॉ. बबीता राजपूत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मातृभाषेबरोबर इतर भाषेवर प्रभुत्व मिळवाल तरच यशस्वी व्हाल - व्याख्यात्या डॉ. बबीता राजपूत


चिंचवड (प्रबोधन न्यूज ) -  कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा गु्रप ऑफ इन्स्टिट्युटच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज व प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या वतीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला त्याचे उद्घाटन डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या भाषा विभाग प्रमुख डॉ. बबीता राजपूत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी हिंदी दिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या हिंदी दोहे स्पर्धेतील गुणानुक्रमाने विजेते ठरलेले सुखदा मोरे, सियान पठाण, सिंद्रा बेग, अनु दास तर निबंध स्पर्धेतील श्वेता नलावडे, साक्षी कुंभार, खुशबु गौड व वनिशा चेलानी यांचा व्याख्यात्या डॉ. बबीता राजपूत तसेच एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे, कलाशाखा कार्यक्रम प्रमुख डॉ. रुपा शहा यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा गायकवाड कार्यक्रमाचे संयोजक व हिंदी विभागाचे डॉ. रविंद्र निरगुडे, परीक्षक प्रा. सुशिल भोंग, प्रा. स्नेहा भाटीया आदी उपस्थितीत विद्यार्थ्यांनी हिंदीतून शायरी, कविता आदींचे सादरीकरण केले. संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
व्याख्यात्या डॉ. बबीता राजपूत मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनो तुमचे शैक्षणिकदृष्ट्या क्षेत्र कोणतेही असो, तुमच्याकडे अपार ज्ञान असेल, पण त्यांचे इतर भाषेत सादरीकरण करता आले पाहीजे. तसे करता आले नाही तर, तुम्ही मागे रहाल, आपल्या मातृभाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी, भाषा अवगत करून प्रत्यक्ष व्यवहारात वापर करा. लक्षात ठेवा, ज्ञान आत्मसात करताना मानवता हरविता कामा नये, हिंदी भाषा गोड वैभवशाली आहे. भारत देशात विविध राज्यात तेथील मातृभाषा बरोबर हिंदी भाषा व्यवहारात संपर्कासाठी उपयोगी पडते. हिंदीतून बोललात तर फरक पडणार नाही. संभाषण, शब्दफेक, अचूक सादरीकरणामुळे समाजमनावर प्रभाव टाकता येतो. त्यासाठी सजग राहिले पाहिजे. स्मार्टवर्क करताना आपले विचार स्मार्ट आहे का? याचा प्रत्येकाने विचार करावा, मला आवडत नाही, ही विचारसरणी सोडून मला आवडते या भावनेतून हिंदी भाषेकडे पाहण्याची सवय अंगिकारत आपल्या जीवनाला उत्तुंग व संपन्न बनवा. त्यासाठी योग्य गुरू निवडा व भाषेचे कौशल्य आत्मसात करा.
डॉ. सचिन बोरगावे, डॉ. वनिता कुर्‍हाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्तावना मुख्य संयोजक डॉ. रविंद्र निरगुडे यांनी मानले, सूत्रसंचालन रोशनी भारती व वनिशा चेलानी यांनी तर, आभार डॉ. रूपा शहा यांनी मांडले.