विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला 

विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला 
मुंबई -
मुंबईतील विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना झटका दिलाय. न्यायालयाने देशमुख यांचा मनी लाँडरिंग प्रकरणातील डिफॉल्ट बेलचा अर्ज फेटाळला आहे. 
सक्तवसुली संचलनालयाने (ED) अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली. ईडीने अनिल देशमुख हेच सचिन वाझेने डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ मध्ये बार मालकांकडून वसुल केलेल्या खंडणीचे मुख्य लाभार्थी असल्याचा आरोप केलाय. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला. जामीन अर्जात देशमुख यांनी आपल्याला न्यायालयीन कोठडीत पाठवल्याचा आणि क्रिमिनल प्रोसिजरनुसार त्याची ६० दिवसांची मर्यादा ओलांडली असल्याचा युक्तीवाद केला होता. यावेळी देशमुखांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ डिसेंबर २०२१ रोजी वाढ करून ती ९ जानेवारी २०२२ पर्यंत केल्याचंही म्हटलं.