भाजपच्या नाकर्तेपणामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट – सतीश दरेकर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपच्या नाकर्तेपणामुळे शहरावर  पाणीटंचाईचे संकट – सतीश दरेकर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला चोवीस तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या नाकर्त्या आणि भ्रष्ट कारभारामुळे चिंचवडसह संपूर्ण शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शेकडो कोटींच्या निविदा काढून त्याद्वारे स्वत:चे हित साधणाऱ्या भाजपच्या नेत्यांना येत्या महापालिका निवडणुकीत जनतेने त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन माजी नगरसेवक सतीश दरेकर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली शहरात संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक 28, केशवनगर, तानाजीनगर, श्रीधरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सतीश दरेकर बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, माजी महापौर अपर्णाताई डोके, सामाजिक कार्यकर्ते निलेश डोके, ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य निवृत्ती शिंदे यांच्यासह राजाराम गावडे, श्रीधर वाल्हेकर, माजी नगरसेकव राजेंद्र साळुंखे, पुष्पाताई शेळके, संगीता ताई कोकणे, सुप्रियाताई पवार, विजयाताई काटे, प्रभागातील ज्येष्ठ नागरीक व महिला भगीनी उपस्थित होत्या.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले, गतवेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी अनेक आश्वासने दिली. त्यामध्ये शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र त्यापैकी एकही आश्वासन भाजपने आपल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात पूर्ण केले नाही. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात दिवसातून दोनवेळा पुरेसा पाणीपुरवठा होत होता. भाजपाने चोवीस तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देऊन दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ आणली. आता ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर त्यांच्या निष्क्रीय आणि नाकर्तेपणाचा फटका शहरवासियांना बसत आहे. शेकडो कोटींच्या निविदा काढून केवळ आपली खळगी भरणाऱ्या या नेत्यांनी भामा आसखेडसह एकही पाणीपुरवठ्याची योजना योग्य पद्धतीने राबविली नाही.

केवळ निविदा काढणे आणि भ्रष्टाचार करणे या एकमेवक कामामुळे शहरावर सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चिंचवडमधील जनता पाण्यासाठी सैरभैर झाली असून महिला भगिनींना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. पाण्यासाठी भटकंतीची वेळ आणणाऱ्या भाजपवासियांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. आपल्यावर पाणीटंचाईचे संकट लादणाऱ्या या निष्क्रीय आणि भ्रष्टाचाऱ्यांना महापालिका निवडणुकीत जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.