भोसरी येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ‘उद्योजक संवाद’
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
औद्योगिक क्षेत्राच्या समस्यांबाबत चर्चा : लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची उपस्थिती
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँन्ड ॲग्रीकल्चरलच्या (MCCIA) माध्यमातून भोसरी येथे पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्राच्या समस्या आणि उपाययोजना याबाबत उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रम उत्साहात झाला.
भोसरी येथील एमआयडीसी, टेल्को रोड, जे- ४६२ येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या (MCCIA) कार्यालयात हा ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. MCCIA च्या माध्यमातून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकप्रतिनिधींच्या सहभागाने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय अधिकारी, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी, महावितरणचे अधिकारी, लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, अभय भोर, श्री. सुरेश म्हेत्रे, MCCIA चे अध्यक्ष दीपक करंदीकर, मुख्य संचालक प्रशांत गिरबने, संचालक सुधानवा कोपर्डेकर यांच्यासह विविध कंपन्यांची प्रमुख प्रतिनिधी, मान्यवर उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात पहिल्यांदा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहरात तीनदा बैठक घेतली. उद्योजकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. शास्तीकरासारखा जटील मुद्दा मार्गी लावण्यात यश मिळाले. तसेच, लघु उद्योजक संघटनेच्या कार्यालयासाठी जागेचा प्रश्नही मार्गी लागला असून, आगामी काळात उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे, असे आश्वासनही आमदार लांडगे यांनी दिले.