'हे' आहेत जगातील सर्वात शक्तिशाली प्राणी, जे उचलतात शेकडो किलो वजन ! 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'हे' आहेत जगातील सर्वात शक्तिशाली प्राणी, जे उचलतात शेकडो किलो वजन ! 
मुंबई  -

जगात विविध प्रकारचे प्राणी राहतात. यातील काही प्राणी हिंस्त्र असतात, तर काही अतिशय शांत असतात. काही मांस खाऊन पोट भरतात, तर काही गवत खातात. काही प्राणी बलवान असतात, काही दुर्बल असतात. असे काही प्राणी आहेत, जे धोकादायक नसतात पण खूप शक्तिशाली असतात. आज आपण अशा प्राण्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे धोकादायक नसतात, परंतु त्यांचे शरीर डोंगरासारखे मजबूत असते. हे प्राणी स्वभावाने शांत असले तरी इतर प्राण्यांपेक्षा त्यांच्यात ताकद जास्त असते. त्यांच्या शरीरात इतकी ताकद आहे की ते एका झटक्यात शेकडो किलो वजन उचलू शकतात. चला तर मग आज अशाच काही प्राण्यांबद्दल जाणून घेऊया, जे स्वभावाने शांत असले तरी ताकदीच्या बाबतीत भयानक प्राणीही त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत.

१. बेल्जियन ब्लू बुल
बेल्जियन ब्लू बुल हा जगातील सर्वात शक्तिशाली प्राण्यांपैकी एक आहे. हे बैल सिंह किंवा वाघासारखे धोकादायक नसले तरी ते मजबूत उंचीचे आहेत. त्यांचे वजन 1200 kg म्हणजे 12 टन आहे आणि ते 900 kg वजन अगदी सहज उचलू शकतात.
 
२. हत्ती
हत्ती हा विशालकाय प्राणी आहे. सिंह आणि वाघ याच्यासमोर यायलाही घाबरतात. हा पृथ्वीवरील सर्वात वजनदार प्राणी मानला जातो, जर कोणताही जीव त्याच्या पायाखाली आला तर त्याचे जगणे अशक्य आहे. हत्ती फक्त भारतातच नाही तर जगातील इतर देशांमध्येही त्यांची लोकसंख्या दिसून येते. हत्तींमध्ये आफ्रिकन हत्ती सर्वात शक्तिशाली मानले जातात. त्यांचे वजन 6 हजार किलोपर्यंत असते आणि ते त्यांच्या सोंडेने 300 किलोपर्यंत वजन उचलू शकतात. यावरूनच त्यांच्या अचाट सामर्थ्याची कल्पना येऊ शकते.

३. गेंडा
गेंडा हा शरीराने मोठा प्राणी आहे. हा सर्वात वजनदार आणि शक्तिशाली प्राण्यांपैकी एक आहे. त्यांचे सरासरी वजन 2000 ते 3000 किलो पर्यंत असते. काही गेंड्यांचे वजन 3500 किलोपर्यंत असू शकते. ते इतके शक्तिशाली आहेत की त्यांना राग आला तर ते सर्वात मोठ्या प्राण्याला चिरडून टाकू शकतात.

४. हिप्पोपोटॅमस 
हा प्राणी छेडछाड होईपर्यंत शांत प्राण्यांपैकी एक मानला जातो. त्याला राग आला तर तो कुणालाही समोर उभे राहू देत नाही आणि समोरच्या प्राण्याला मारून सुटका करून घेतो. हिप्पोपोटॅमसचे वजन 4 हजार किलोग्रॅम पर्यंत असू शकते.