डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तक मुलांवर चांगले संस्कार घडवतील – सुनिता अडसुळे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तक मुलांवर चांगले संस्कार घडवतील – सुनिता अडसुळे

पिंपरी चिंचवड, दि. 22 एप्रिल -  भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 21 मार्च रोजी जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र, येरवडा, पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी सेल व स्त्री शक्ती जागरण मंच यांच्या वतीने तसेच राष्ट्रवादीच्या झोपडपट्टी सेल अध्यक्षा सुनीताताई अडसुळे यांच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र व भारतीय संविधान वितरण तसेच अन्नदान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षा कविता ताई आल्हाट प्रमुख उपस्थित होत्या. सामाजिक समतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य चंदनासारखे झिजवले अशा महामानवाच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने येरवडा येथील बाल सुधारगृहातील मुलांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तके व भारतीय संविधानाचे वितरण करण्यात आले ज्यामुळे या बालसुधारगृहातील मुलांवर चांगले संस्कार घडतील व त्यांचे भावी जीवन देशाच्या जडणघडणीसाठी उपयोगी पडेल या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया सुनिताताई अडसुळे यांनी दिली

या कार्यक्रम प्रसंगी बाळ सुधार गृहाचे अधीक्षक जी. एन. पडघन साहेब यांचा राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षा कविता ताई आल्हाट यांच्या हस्ते महात्मा फुलेंची पगडी, उपरणे व भारताचे संविधान देऊन सन्मान करण्यात आले व सर्व राष्ट्रीय नेत्यांचे पुस्तक देण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष कविताताई अल्हाट यांच्यासह भोसरी पोलीस स्टेशन निरीक्षक नितीन लांडगे, कविताताई खराडे, मनोज दादा गायकवाड, काशिनाथ गायकवाड, अमित कांबळे, इंद्रजीत सकट, गौतम वानखडे, शीलाताई गायकवाड, विनय शिंदे, अहमद शेख, निजामशाह आदी मान्यवर उपस्थित होते.