अनेक संकटं आली, वादळं आली, पण कधी डगमगलो नाही - अशोक चव्हाण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अनेक संकटं आली, वादळं आली, पण कधी डगमगलो नाही - अशोक चव्हाण


नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा वाढदिवस काल साजरा झाला. देगलूर-बिलोली निवडणूकीचा प्रचार थांबत नाही तोच प्राप्तीकर विभागाने चव्हाण यांच्यांशी संबंधित चार सारखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची चौकशी सुरू केली. पोटनिवडणुकीचे मतदान अवघ्या २४ तासांवर आलेले असतांना झालेली ही कारवाई संशयस्पाद आणि राजकीय द्वेषातून करण्यात आल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर देखील चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. या सर्वांचे आभार त्यांनी आज ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले. परंतु या ट्विटमधून त्यांनी प्राप्तीकर विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या आकस्मिक निधनामुळे देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून प्रचारासाठी त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिंधींची देखील त्यांना साथ मिळाली. भाजपने देखील ही निवडूक गांभीर्याने घेत अशोक चव्हाण यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. आता अशोक चव्हाण यांच्यांशी संबंधित जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना बुलडाणा अर्बन क्रेडीट सोसायटीने दिलेल्या कर्ज प्रकरणाची अचानक प्राप्तीकर विभागाने चौकशी सुरू केली.
गेल्या तीन दिवसांपासून ही चौकशी सुरू असल्याचे समजते. पोटनिवडणुकीचा प्रचार संपत नाही तोच, ही कारवाई झाल्याने अशोक चव्हाण यांना अडकवण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. अशोक चव्हाण यांनी स्वतः मतदानाच्या तोंडावर झालेली ही कारवाई राजकीय द्वेष भावनेतून केल्याचा आरोप केला आहे.